शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भारताला ३-० ने विजयाची संधी

By admin | Updated: December 6, 2015 01:43 IST

माझ्या मते दक्षिण आफ्रिका संघ मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. विशेषता दोन कसोटी सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाची मानसिक स्थिती ढासळलेली आहे.

वसीम अक्रम लिहितो...

माझ्या मते दक्षिण आफ्रिका संघ मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. विशेषता दोन कसोटी सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. उपखंडातील संघांनाही अशा स्थितीला सामोरे जावे लागते. विशेषता आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पूर्ण शक्ती खर्ची घातलेली असते आणि त्यातही पराभव स्वीकारावा लागला तर मानसिकता ढासळते. मानसिकदृष्ट्या तुम्ही दौरा संपविण्यास प्रयत्नशील असता, पण मनाने मात्र तुम्ही तेथे नसता. अगदी याच स्थितीतून सध्या कोटला स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका संघ जात आहे. दक्षिण आफ्रिकन खेळाडू सध्या तनाने येथे असले तरी मनाने मात्र नाहीत. या खेळपट्टीवर फलंदाज व गोलंदाजांसाठी या खेळपट्टीमध्ये निश्चितच काहीतरी आहे. ही काही टर्नर नाही, पण उपखंडातील खेळपट्टी आहे. दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवातीलाच संधी गमावली आहे. त्यामुळे यजमान संघाला वर्चस्वाची संधी मिळाली. रिव्हर्स सिंग कसे खेळावे हे विराट आणि अजिंक्यने द. आफ्रिकेला दाखवून दिले. इनिस्विंग निष्प्रभ ठरविण्यासाठी दोघांनी फ्रंट फूटचा वापर केला. द. आफ्रिकेचे फलंदाज उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर सराव करीत असल्याने बॅकफूटवर खेळतात. अशावेळी पायचित होण्याची शक्यता अधिक वाढते. रिव्हर्स स्विंगला बॅकफूटवर खेळणारा फलंदाज पायचित झाला म्हणून समजा. वकारने असे अनेक बळी घेतल्याचे मला आठवते. द. आफ्रिकेला चांगली सुरुवातही मिळाली नाही आणि त्यांचे फलंदाज मोठी भागीदारी करण्यातही अपयशी ठरले. डुप्लेसिस आणि अमला हे तर फार्ममध्ये नव्हतेच. डेल स्टेनची जखम आणि कालिसची निवृत्ती या संघाला मागे नेऊन ठेवणारी ठरली. प्रभावी फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा देखील धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. फिरकीविरुद्ध हा संघ किती अपयशी ठरला हे आपण पाहिलेच आहे. विराटऐवजी मी असतो तर चौथ्या दिवशी काही तास फलंदाजी केली असती. डाव कधी घोषित करायचा याचा निर्णय नंतर घेतला असता. या सामन्यात अद्याप १८० षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणूनच भारताला मालिका ३-० ने खिशात घालण्याची मोठी संधी आहे. (टीसीएम)