शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे दोन सराव सामने

By admin | Updated: January 8, 2016 03:35 IST

भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुक्रवारी आणि शनिवारी वाका मैदानावर पश्चिम आॅस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे.

पर्थ : भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुक्रवारी आणि शनिवारी वाका मैदानावर पश्चिम आॅस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे.शुक्रवारी खेळली जाणारी लढत टी-२० राहणार असून, शनिवारी दुसरी लढत ५० षटकांची होईल. सराव सामन्यात सहभागी होणारा पश्चिम आॅस्ट्रेलियाचा मुख्य संघ राहणार नाही. कारण, त्यांचा मुख्य संघ पर्थ स्कोरचर्सच्या नावाने बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. त्यांचे खेळाडू सराव सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे पश्चिम आॅस्ट्रेलियाचा दुय्यम दर्जाचा संघ सराव सामन्यात सहभागी होईल. भारत-आॅस्ट्रेलियादरम्यानच्या ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत १२ जानेवारी रोजी खेळली जाणार आहे. वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आॅस्ट्रेलियात डेरेदाखल झाला आहे, तर टी-२० स्पेशालिस्ट युवराज सिंह, हरभजन सिंग व आशिष नेहरा हे खेळाडू वन-डे मालिका संपल्यानंतर संघात सामील होतील. दोन सराव सामन्यांच्या निमित्ताने कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि संघ संचालक रवी शास्त्री यांना संभाव्य ११ खेळाडू निश्चित करण्यासाठी मदत मिळेल. सराव सामन्याला अधिकृत दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे यात सर्व खेळाडूंना सहभागी होण्याची संधी आहे. कर्णधार धोनीसाठी सध्या सुरेश रैनाच्या स्थानी कुणाला संधी द्यायची, हा प्रश्न ऐरणीवर आहे. मनीष पांडे आणि गुरकिरत मान यांच्यापैकी एकाला या स्थानी संधी मिळण्याची शक्यता आहे. मनीष पांडेने आतापर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव वन-डे सामना खेळलेला आहे. त्यात त्याने ७१ धावांची खेळी केली होती, तर गुरकिरतने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. गुरकिरत चांगला आॅफ ब्रेक गोलंदाज आहे. जर धोनी स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून केवळ रविचंद्रन अश्विनला खेळवणार असेल, तर गुरकिरत दुसरा फिरकीपटू म्हणून पर्याय ठरू शकतो. (वृत्तसंस्था)