शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भारताने पाकला लोळवले

By admin | Updated: February 28, 2016 01:11 IST

भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी

मीरपूर : भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी प्रख्यात असलेल्या विराट कोहलीच्या ४९ धावांमुळे भारताने विजयी जल्लोष केला, तर पाकमध्ये पराभवाची शोककळा पसरली. भारतीय संघाचा स्पर्धेतील हा दुसरा विजय असून, गुणतालिकेत ते ४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत.पंड्याच्या नेतृत्वात गोलंदाजांनी पाकिस्तानचा १७.३ षटकांत ८३ धावांत खुर्दा उडविल्यानंतर लहान धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताचीही सुरुवातीला दमछाक झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमेर याने पहिल्या दोन षटकांत तीन गडी बाद करीत सनसनाटी निर्माण केली होती. भारताने तीन गडी अवघ्या आठ धावांत गमविल्यानंतर कठीण स्थितीत विराटने युवराजसिंगसोबत खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. चौथ्या गड्यासाठी या दोघांनी ११.३ षटकांत ६८ धावांची भागीदारी करीत पाकच्या तोंडचे पाणी पळविले. विराट अर्धशतकापासून एका धावेने वंचित राहिला, पण तोवर भारताने विजयी पथावर मार्गक्रमण केले होते. विराट बाद होताच दुसऱ्याच चेंडूवर हार्दिक पंड्यादेखील खाते न उघडताच बाद झाल्याने पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली. पण लक्ष्य लहान असल्याने भारताने १५.३ षटकांत ५ बाद ८५ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटने दोन वर्षांपृूर्वी विश्वचषकात बांगलादेशात पाकविरुद्ध ३६ धावांची खेळी केली होती. त्या वेळी भारत ७ गड्यांनी जिंकला. आजही त्याने जिगरबाज खेळी केली. युवराज सुरुवातीला अडखळला; पण विराटच्या सोबतीने तो खेळपट्टीवर उभा होता. युवराजने दोन चौकारांसह ३२ चेंडूंत नाबाद १४ धावांचे योगदान दिले. कर्णधार धोनीने विजयी चौकारासह सात धावा केल्या. आमेरची चार षटके संपताच भारतावरील दडपण नाहीसे झाले. त्याने पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना भोपळा न फोडू देताच पायचीत केले. त्यानंतर सुरेश रैनाला (१) वहाब रियाझकडे झेल देण्यास भाग पाडले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर मैदानावर आलेल्या आमेरने पाकच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या; पण विराटच्या पराक्रमी फलंदाजीने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. धोनीने युवराजसोबत भारताचा विजय प्रशस्त केला. धोनीने चौकार मारताच २७ चेंडू आधीच सामना संपला. (वृत्तसंस्था)१२८ पाकिस्तानची भारताविरुद्धची टी-२० मधील नीचांकी धावसंख्या. २०१२ सप्टेंबरमध्ये कोलंबो येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव १२८ धावांत संपुष्टात आला. या सामन्यात कोहलीने नाबाद ७८ धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना १७व्या षटकांतच जिंकला. ८२ एप्रिल २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तान संघाची ८२ ही नीचांकी धावसंख्या होती. ७४ सप्टेंबर २०१२ मध्ये आॅस्ट्रेलिया दुबई येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव ७४ धावांत संपुष्टात आला.धावफलकपाकिस्तान : मोहम्मद हफिज झे. धोनी गो. नेहरा ४, शरजील खान झे. रहाणे गो. बुमराह ७, मंझृूर धावबाद(कोहली) १०, शोएब मलिक झे. धोनी गो. पंड्या ४, उमर अकमल पायचित गो. युवराजसिंग ३, सर्शराज अहमद त्रि. गो. जडेजा २५, शाहीद आफ्रिदी धावबाद(जडेजा/धोनी) २, वहाब रियाझ पायचित गो. जडेजा ४, मोहम्मद सामी झे. रैना गो. पंड्या ८, मोहम्मद आमेर त्रि. गो. पंड्या १, मोहम्मद इरफान नाबाद ००, अवांतर १५, एकूण: १७.३ षटकांत सर्वबाद ८३ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ३-०-२०-१, बुमराह ३-२-८-१, हार्दिक पंड्या ३.३-०-८-३, युवराजसिंग २-०-११-१, रवींद्र जडेजा ३-०-११-२, रवीचंद्रन अश्विन ३-०-२१-०भारत : रोहित शर्मा पायचीत गो. मोहम्मद आमेर ००, अजिंक्य रहाणे पायचीत गो. आमेर ००, विराट कोहली पायचीत गो. मोहम्मद सामी ४९, सुरेश रैना झे. वहाब रियाझ गो. मो. आमेर १, युवराजसिंग नाबाद १४, हार्दिक पंड्या झे. हफिज गो. मोहम्मद सामी ००, धोनी नाबाद ७, अवांतर :१४, एकूण: १५.३ षटकांत ५ बाद ८५; गोलंदाजी : मो. आमेर ४-०-१८-३, मो. सामी ४-०-१६-२, मोहम्मद इरफान ४-०-१६-०, वहाब रियाझ ३.३-०-३१-०.