शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

भारताला अखेर ‘रौप्य’ समाधान

By admin | Updated: June 18, 2016 03:12 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारलेल्या भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये जगजेत्त्या ऑस्ट्रेलियाकडून चुरशीच्या झालेल्या लढतीत १-३ असा

चॅम्पियन्स ट्रॉफी : पेनल्टी शुटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-१ विजय लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारलेल्या भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये जगजेत्त्या ऑस्ट्रेलियाकडून चुरशीच्या झालेल्या लढतीत १-३ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे पहिल्यांदा ‘चॅम्पियन’ बनण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.संपुर्ण सामन्यात जबरदस्त बचावाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले. यावेळी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या नेहमीच्या आक्रमक खेळाच्या जोरावर गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कमालीचे बचाव करताना भारताने ऑस्ट्रेलियाला संघाला गोल करण्यापासून रोखले. दरम्यान, भारताचा गोलरक्षक पी. श्रीजेश याने केलेल्या निर्णायक बचावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या सर्व योजना अपयशी ठरल्या. निर्धारीत वेळेत सामना गोलशुन्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊट खेळविण्याचा निर्णय झाला आणि येथेच दडपणाखाली आलेल्या भारतीयांच्या हातातील जेतेपद निसटले.ऑस्ट्रेलियाकडून डॅनिएल बेले, सिमॉन आॅर्चर्ड आणि अरन झलेवस्की यांनी निर्णायक गोल केले. तर भारताकडून एकमेव गोल हरमनप्रीत सिंग याने केला.सहा देशांच्या राऊंड रॉबिन स्पर्धेला १९७८ मध्ये प्रारंभ झाल्यानंतर भारताने प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली. भारताने आतापर्यंत केवळ १९८२ च्या अ‍ॅमस्टर्डम स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवलेला होता. या स्पर्धेत भारताला ७ वेळा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ब्रिटन आणि बेल्जियम यांच्यादरम्यानची लढती ३-३ गोल बरोबरीत संपल्यामुळे भारतीय संघसाठी अंतिम फेरीचे दार उघडले होते. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या भारताला ब्रिटनचे आभार व्यक्त करायला हवे. कारण, दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर अखेरच्या साखळी लढतीत ब्रिटनने बेल्जियमला ३-३ ने बरोबरीत रोखले. भारताला गुणांच्या आधारावर पिछाडीवर सोडण्यासाठी ब्रिटनला विजय आवश्यक होता, तर बेल्जियमला तीन गोलच्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे होते. ब्रिटन आणि बेल्जियम लढत अनिर्णित संपल्यामुळे हे दोन्ही संघ राऊंड रॉबिन लीगमध्ये भारतापेक्षा पिछाडीवर राहिले. त्यामुळे भारताला आज खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत संधी मिळाली. सर्व तिन्ही गोल अखेरच्या क्वार्टरमध्ये नोंदवल्या गेल्यामुळे भारतीय चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. सामना संपायला पाच सेकंदाचा अवधी शिल्लक असताना ब्रिटनतर्फे गोल नोंद झाली असती, तर यजमान संघ अंतिम फेरीत दाखल झाला असता. त्यापूर्वी भारताला अखेरच्या साखळी लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध २-४ ने पराभव स्वीकारावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीने ग्रेट ब्रिटनला १-० ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)