शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

भारताने बलाढ्य कतारला रोखले बरोबरीत; फिफा विश्वचषकाच्या आशा अजूनही जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 06:38 IST

गोलरक्षक गुरप्रीत सिंगचा भक्कम बचाव निर्णायक

दोहा : फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत सलामीला ओमानकडून १-२ ने धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारताने मंगळवारी बलाढ्य कतारचे आव्हान गोलशून्य बरोबरीत परतवले. जागतिक क्रमवारीत ६२ व्या क्रमांकावर असलेला आशियाई विजेता कतार तुलनेत कमजोर असलेल्या भारताला मात देईल, अशी शंका व्यक्त केली जात होता. सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानवर ६-० असा विजय मिळवल्यामुळे भारताविरुद्धही कतारचेच पारडे जड मानले जात होते. तथापि १०३ व्या क्रमांकावरील भारताने त्यांचे आव्हान दमदार खेळी करून परतवून लावले.

आक्रमक खेळ करणाऱ्या यजमान संघाला भारताने एकदाही गोल करू दिला नाही. यामुळे भारताच्या विश्वचषकाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने उपस्थित प्रेक्षकांचे हात वर करून आणि टाळ्या वाजवून अभिवादन केले. त्यावेळी भारतीय संघासाठी स्टेडियममध्ये टाळ्यांचा पाऊस पडला. स्टार सुनील छेत्रीच्या अनुपस्थित भारताचे नेतृत्त्व करणाºया गोलरक्षक गुरप्रीत सिंगचे भक्कम संरक्षण या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. गुरप्रीतने जबरदस्त संरक्षण करताना कतारचे आक्रमण अनेकदा रोखून त्यांना गोल करण्यापासून दूर ठेवले.

या आधी चारपैकी तीन अधिकृत लढती कतारने जिंकल्या होत्या, तर एक लढत बरोबरीत सुटली होती. या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत कतारने भारताचा ६-० असा धुव्वा उडवला होता. २०२२ मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाºया कतारने गेल्या काही वर्षांत आपल्या खेळात कमालीची सुधारणा घडवून आणली. यावर्षी संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या आशियाई चषकाचे विजेतेपद त्यांनी पटकावले.

निमंत्रित म्हणून खेळणाºया कतारने कोपा अमेरिका स्पर्धेत दक्षिण आशियाई संघांनाही कडवी झुंज दिली होती. त्यामुळे भारताचा त्यांच्यापुढे निभाव लागेल की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात साशंकता होती. पण भारतानेही गेल्या काही दिवसात आपली कामगिरी उंचावली असून आशियाई स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात आणि बहारिनसारख्या संघांना चांगली लढत दिली. बाद फेरी मात्र थोडक्यात हुकली होती. एक गुण मिळाल्याचा आनंद - प्रशिक्षक स्टिमकआशियाई चॅम्पियन कतारला रोखून एका गुणाची कमाई केल्याचा आनंद असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी व्यक्त केले. मात्र पुढील सामन्यात अतिआत्मविश्वासात न राहण्याचा खेळाडूंना सल्लाही दिला. स्टिमक म्हणाले, ‘आम्ही फार पुढचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून वेळ घालवू इच्छित नाही. काही दिवसांआधी ओमानकडून पराभूत झालो. यानंतर कतारविरुद्ध वरचढ खेळ करत एक गुण मिळू शकलो.’ भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे बोट दाखविणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘आमचा संघ तंदुरुस्त आहे, हे खेळाद्वारे दाखवून दिले.’ भारताला आता १५ आॅक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे सामना खेळायचा आहे.‘फुटबॉलमध्ये काहीही घडू शकते!’‘मला माझ्या संघाच्या कामगिरीवर फारच गर्व वाटतो. सांघिक प्रयत्नात आम्हाला यश आले. अन्य सामन्यांमध्ये या खेळाचा लाभ होईल. आम्ही आतापर्यंत दोनच सामने खेळले आणि दोन्हीवेळा बलाढ्य संघांना सामोरे गेलो. यामुळे आत्मविश्वासात भर पडली असून, फुटबॉलमध्ये काहीही शक्य असल्याचा अनुभव आला. सर्व सहकाºयांनी शंभर टक्के योगदान दिल्यामुळे समाधानाने ड्रेसिंग रुममध्ये परत आलो,’ असे भारताचा हंगामी कर्णधार गुरप्रीत सिंग याने सांगितले.

टॅग्स :Footballफुटबॉल