चार गडी राखत भारताची विंडीजवर मात
By Admin | Updated: March 6, 2015 19:57 IST2015-03-06T19:12:33+5:302015-03-06T19:57:23+5:30
चार गडी राखत भारताने विंडीजवर मात केली. देशभरात होळीचा सण साजरा होत असताना भारताच्या विजयाने भारतीयांच्या ऊत्साहाला उधाण आले आहे.

चार गडी राखत भारताची विंडीजवर मात
>
ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ६ - चार गडी राखत भारताने विंडीजवर मात केली. देशभरात होळीचा सण साजरा होत असताना भारताच्या विजयाने भारतीयांच्या ऊत्साहाला उधाण आले आहे.
जेरॉम टेलरच्या तेज गोलंदाजीपुढे रोहित शर्मा व शिखऱ धवन अनुक्रमे सात व नऊ धावा करत तंबूत परतल्याने भारतीय प्रेक्षकांची घोर निराशा झाली होती. विराट कोहलीचा जम बसत असतानाच रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना मार्लन सॅम्युअलकडे झेल गेल्याने ३३ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. फक्त १४ धावा करत केमर रॉचच्या चेंडूवर यष्टिरक्षक रामादिनकडे झेल गेल्याने अजिंक्य रहाणे बाद झाला.
तीन चौकार व एक षटकार लगावत कर्णधार धोनीने ५६ चेंडूत ४५ धावा केल्या. भारतीय फलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचा तेज तर्रार गोलंदाज जेरॉम टेलर व आंद्रे रसेल या गोलंदाजांचे आव्हान होते. आठ षटकांमध्ये टेलरने ३३ धावा देत रोहित शर्मा व शिखर धवन या पहिल्या फळीतील फलंदाजांना तंबूत परत पाठवले. तसेच आंद्रे रसेल ने ४३ धावा देत विराट कोहली व रविंद्र जडेजा यांचा बळी घेतला होता. कर्णधार धोनी व रविचेंद्र अश्विन यांच्या टिकून राहण्याने भारताला विजय सहज शक्य झाला.