भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पुढे ढकलली
By Admin | Updated: November 29, 2014 13:21 IST2014-11-29T13:11:46+5:302014-11-29T13:21:57+5:30
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या निधनामुळे भारत -ऑस्ट्रेलियादरम्यान होणारा पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पुढे ढकलली
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २९ - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या निधनामुळे भारत -ऑस्ट्रेलियादरम्यान होणारा पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे ही घोषणा ढकलण्यात आली आहे. ४ डिसेंबर रोजी पहिला सामना होणार होता, मात्र ३ तारखेलाच ह्युजवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या मित्राला गमावल्यामुळे संघातील इतर खेळाडू लगेच सामना खेळण्याच्या मनस्थितीत नसतील हे लक्षात घेऊन ही कसोटी पुढे ढकलण्यात आली आहे. हा सामना नक्की कधी होईल याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी १२ ते २६ डिसेंबरच्या दरम्यान सामना खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना न्यू साऊथ वेल्सचा वेगवान गोलंदाज सीन एबोटचा बाऊंसर लागून ह्युजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयातील उपचारांदरम्यान दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.