भारताला लागोपाठ चार धक्के, भारत ६ बाद २९८
By Admin | Updated: February 22, 2015 12:42 IST2015-02-22T09:51:03+5:302015-02-22T12:42:03+5:30
वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतकवीर शिखर धवन, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २९८ अशी झाली आहे.
भारताला लागोपाठ चार धक्के, भारत ६ बाद २९८
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २२ - वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर शिखर धवनने दमदार शतक ठोकल्याने भारताने २०० चा टप्पा ओलांडला आहे.
पाकिस्तानवर मात केल्याने आत्मविश्वास दुणावलेला भारत आणि वर्ल्डकपमध्ये चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी इच्छूक असलेला दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ मेलबर्नमधील मैदानावर आमने सामने आहेत. नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला मैदानात उतरली. दोघांनी सावत्र पवित्रा घेत फलंदाजी केली. मात्र संघाच्या ९ धावा झाल्या असताना रोहित शर्मा धावबाद झाला. रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. रोहित बाद झाल्यावर विराट कोहली मैदानात उतरला होते. या जोडीने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. कोहली ४६ धावांवर असताना झेलबाद झाला. यानंतर मैदानात उतरलेल्या अजिंक्य रहाणेने धवनला मोलाची साथ दिली. सध्या धवन नाबाद ११३ तर अजिंक्य रहाणे नाबाद ३९ धावांवर खेळत आहे.भारताने ३ षटकांत २ गडी गमावत २०४ धावा केल्या आहेत.