भारत बदलणार आयसीसी पॅनलमधील पंच
By Admin | Updated: February 25, 2016 03:54 IST2016-02-25T03:54:12+5:302016-02-25T03:54:12+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी सत्रासाठी पंचांच्या पॅनलमधील विनीत कुलकर्णी यांचे नाव बदलून दुसऱ्या कोणाचे तरी नाव घोषित करण्याची शक्यता आहे.

भारत बदलणार आयसीसी पॅनलमधील पंच
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी सत्रासाठी पंचांच्या पॅनलमधील विनीत कुलकर्णी यांचे नाव बदलून दुसऱ्या कोणाचे तरी नाव घोषित करण्याची शक्यता आहे.
‘बीसीसीआय’च्या पंंचांच्या वार्षिक आढावा बैठकीत कुलकर्णी यांच्या जागी दुुसऱ्या पंचाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या जागी अनिल चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भारतात झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी कुलकर्णी यांनी केलेल्या चुका त्यांना भोवण्याची
शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावेळी कुलकर्णी यांनी काही चुकीचे
निर्णय दिले होते. त्यामुळे
सामन्याच्या निकालावर परिणाम झाला होता. या दौऱ्यानंतर भारतीय संघाने कुलकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. तसेच कुलकर्णी यांनी रणजी सामन्यातही काही वादग्रस्त निर्णय दिले होते. (वृत्तसंस्था)