बीसीसीआय विचारेल तेव्हाच मी मत मांडेन : कोहली

By Admin | Updated: June 30, 2017 01:00 IST2017-06-30T01:00:05+5:302017-06-30T01:00:05+5:30

नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत बीसीसीआयने मत विचारले, तरच मी याबाबत माझे मत देईल, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले.

I will not say when I ask BCCI: Kohli | बीसीसीआय विचारेल तेव्हाच मी मत मांडेन : कोहली

बीसीसीआय विचारेल तेव्हाच मी मत मांडेन : कोहली

अँटिगा : नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत बीसीसीआयने मत विचारले, तरच मी याबाबत माझे मत देईल, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. सध्या भारताच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री असून त्यांचे आणि कोहलीचे संबंध चांगले असल्याने अनेकांना शास्त्री यांची निवड पक्की वाटत आहे.
प्रशिक्षक निवडीबाबत कोहलीला विचारले असता त्याने म्हटले की, ‘वैयक्तिकरीत्या मी काहीही म्हणणार नाही. ज्यावेळी बीसीसीआय आम्हाला याविषयी विचारेल, तेव्हाच संघाच्यावतीने मी माझी बाजू स्पष्ट करेन.’ (वृत्तसंस्था)

Web Title: I will not say when I ask BCCI: Kohli