पॅरालिम्पियन प्रमोद भगतच्या ऐतिहासिक विजयात सचिन तेंडुलकरचा मोठा वाटा; भेटीदरम्यान सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 19:22 IST2021-09-12T19:22:14+5:302021-09-12T19:22:30+5:30
प्रमोदनं अंतिम फेरीत त्यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलवर 21-14 21-17 असा विजय मिळवला.

पॅरालिम्पियन प्रमोद भगतच्या ऐतिहासिक विजयात सचिन तेंडुलकरचा मोठा वाटा; भेटीदरम्यान सांगितला किस्सा
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या प्रमोद भगत ( Pramod Bhagat) यानं नुकतीच महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. प्रमोदनं अंतिम फेरीत त्यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलवर 21-14 21-17 असा विजय मिळवला. भारताचे हे बॅडमिंटनमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. प्रमोद भगत यानं त्याच्या या यशाचे श्रेय अनेकांना दिलं आणि त्यामध्ये सचिन तेंडुलकर याच्या नावाचाही समावेश होता.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; टीम इंडियावर भारी पडलेल्या खेळाडूंना मिळाली संधी
बिहार येथील वैशाली गावातला त्याचा जन्म. पाच वर्षांचा असताना त्याच्या डाव्या पायाची वाढ खुंटली. १३ वर्षांचा असताना तो एकदा बॅडमिंटन सामना पाहायला गेला अन् त्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो ओडिसा येथे स्थायिक झाला. पुढील दोन वर्ष त्यानं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. १५ वर्षांचा असताना त्यानं पहिली स्पर्धा खेळली आणि प्रेक्षकांचा पाठींबा पाहून त्याला आणखी प्रेरणा मिळाली.
प्रमोद यालाही क्रिकेट पाहणे आवडते आणि तेंडुलकरला पाहूनच त्याला बॅडमिंटन कोर्टवर शांत व एकाग्र राहण्याची प्रेरणा मिळाली. तेंडुलकरसोबतच्या भेटीदरम्यान त्यानं ही गोष्ट सांगितली. तो म्हणाला,''लहानपणी मीही क्रिकेट खेळायचो. त्यावेळी आम्ही दूरदर्शनवर क्रिकेट पाहायचो आणि मी नेहमीच सचिनच्या शांत व एकाग्र स्वभावानं प्रभावित व्हायचो. प्रतिकुल परिस्थितीचा सामना करण्याची प्रेरणा मला त्याच्याकडूनच मिळाली.''
''मी त्याचे अनुकरण करायला लागलो होतो. त्याच्या खिलाडूवृत्तीनं मी खूप प्रभावित झालोय. त्यामुळेच मी जेव्हा खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या विचारसरणीचे पालन केले. त्यामुळेच मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसह अनेक स्पर्धेत पुनरागमन करण्यात मदत मिळाली. अंतिम सामन्यात जेव्हा मी ४-१२ असा पिछाडीवर होतो, तेव्हा मी कमबॅक करेन असा विश्वास होता. मी भावनांवर नियंत्रण मिळवण्यासोबत एकाग्रता टीकवून ठेवली आणि पुनरागमन करून सामना नावावर केला,''असेही तो म्हणाला.
मुझे भी आपसे मिलकर बहुत खुशी हुई प्रमोद और आपके बचपन के बारे में जानकर बहुत अच्छा लगा।
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 9, 2021
आपने जो देश के लिए किया है वह बहुत बड़ी सफलता है।
आप भारत ही नहीं, पूरी दुनिया के लिए प्रेरणा के स्रोत हैं।
ऐसे ही 🇮🇳 का नाम ऊंचा करते रहो! 😃🏸 https://t.co/mVYWWjCxAq