आधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नव्हतेः बबिता फोगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:42 IST2018-04-30T14:37:36+5:302018-04-30T14:42:08+5:30

सध्याच्या घडीला देशात खेळाडुंसाठी सर्वोत्कृष्ट वातावरण आहे.

I don't think any of the previous Prime Ministers had taken so much interest in sports Babita Phogat | आधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नव्हतेः बबिता फोगाट

आधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नव्हतेः बबिता फोगाट

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळांविषयी आणि खेळाडुंमध्ये रस घेतात, त्यांच्याविषयी बोलतात, हे बघून बरे वाटते. क्रीडा क्षेत्रात इतका रस घेणारा पंतप्रधान देशाने आजपर्यंत पाहिला नसावा, असे मत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती कुस्तीपटू बबिता फोगट हिने व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा केली होती. तसेच सगळ्या विजेत्या खेळाडूंचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले होते. या पार्श्वभूमीवर आज बबिता फोगट आणि सायना नेहवाल यांनी आज पंतप्रधान मोदींचे आभार मानले. सध्या खेळाडूंसाठी सर्वोत्कृष्ट काळ असल्याचे सांगताना, सगळ्या खेळांमध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सायनाने सांगितले. 






 

Web Title: I don't think any of the previous Prime Ministers had taken so much interest in sports Babita Phogat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.