मी भारताची मुलगी : सानिया

By Admin | Updated: August 30, 2015 22:41 IST2015-08-30T22:41:35+5:302015-08-30T22:41:35+5:30

मी भारताची मुलगी असून या देशामध्ये मुलींना प्रेमाने वागवले जाते, असे नुकतेच देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारप्राप्त ‘खेलरत्न’ जागतिक महिला दुहेरीतील

I am the daughter of India: Sania | मी भारताची मुलगी : सानिया

मी भारताची मुलगी : सानिया

नवी दिल्ली : मी भारताची मुलगी असून या देशामध्ये मुलींना प्रेमाने वागवले जाते, असे नुकतेच देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारप्राप्त ‘खेलरत्न’ जागतिक महिला दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने सांगितले. टेनिसमध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे शनिवारी राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सानियाला खेलरत्नने गौरविण्यात आले.
यावेळी सानियाने सांगितले की, प्रतिष्ठीत खेलरत्नने गौरव झाल्याचा माझ्यासाठी अभिमानाची व गर्वाची बाब आहे. या पुरस्कारामुळे मी उत्साहीत असून आगामी स्पर्धेसाठी मला यशस्वी कामगिरीकरीता प्रोत्साहन मिळाले आहे. या पुरस्काराच्या जोरावर आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी देखील मला आत्मविश्वास मिळाला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: I am the daughter of India: Sania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.