शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

आफ्रिकेला नमवत न्युझीलंड फायनलमध्ये

By admin | Updated: March 24, 2015 15:54 IST

ग्रँट इलियटच्या नाबाद ८४ धावांच्या शानदार खेळीमुळे न्युझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. २४ -  ग्रँट इलियट नाबाद ८४ धावांच्या शानदार खेळीमुळे न्युझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी व १ चेंडू  राखून पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. हाता - तोडांशी आलेला विजय असा हिरावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात २९८ धावांचा पाठलाग करताना कर्णधार मॅकलमने २६ चेंडूत ५९ धावांची खेळी करत न्युझीलंडला चांगली सुरूवात करून दिली. त्याला इलियटची भक्कम (नाबाद ८४) साथ मिळाली. मॅकलम बाद झाल्यानंतर न्युझीलंडचे इतर फलंदाजही पटापट तंबूत परतले. मात्र इलियटने कोरी अँडरसनसोबत (५८) सावध खेळ केला आणि न्युझीलंडला विजय मिळवून देत अंतिम फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेने ढिसाळ क्षेत्ररक्षण  करत रन आऊटच्या तीन संधी गमावल्या आणि 'चोकर्स'चा बसलेला शिक्का पुसून काढण्यात संघ पुन्हा अपयशी ठरला.
६ व्या षटकात मॅकलम बाद झाल्यानंतर पाठोपाठ ८ व्या षटकात विल्यमसन अवघ्या सहा धावांवर बाद झाल्याने न्युझीलंडची स्थिती २ बाद ८१ अशी होती. गेल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणारा मार्टिन गपटील (३४) धावबाद झाला तर रॉस टेलरला (३०) ड्युमिनीने किपरकरवी झेलबाद केले. तर स्टेनच्या गोलंदाजीवर राँची ८ धावांवर असताना बाद झाला. दक्षिण आफ्रिकेतर्फे  मॉर्केलने ३ तर स्टेन व ड्युमिनीने प्रत्येकी १ बळी टिपला. 
दरम्यान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने ४३ षटकांत ५ गडी गमावून २८१ धावा केल्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार न्युझीलंडसमोर विजयासाठी २९८ धावांचे लक्ष्य होते. पावसाच्या व्यत्ययामुळे  खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला, तेव्हा आफ्रिकेने ३८ षटकांत २१६ धावा केल्या होत्या.  खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ४३ षटकांत २८१ धावा केल्या. ड्यु प्लिसिसने (८२) एबी डिव्हिलियर्सच्या ( नाबाद ६५) साथीने शानदार खेळी केली. न्युझीलंडतर्फे अँडरसनने ३ तर बोल्टने २ गडी बाद केले.