कोणी घर देता का घर - पेसचा रिओमध्ये सवाल
By Admin | Updated: August 5, 2016 11:19 IST2016-08-05T11:00:22+5:302016-08-05T11:19:09+5:30
भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसला रिओ ऑलिम्पिक ग्राममध्ये खराब व्यवस्थेचा फटका बसला आहे.

कोणी घर देता का घर - पेसचा रिओमध्ये सवाल
ऑनलाइन लोकमत
रिओ डि जेनोरियो, दि. ५ - भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसला रिओ ऑलिम्पिक ग्राममध्ये खराब व्यवस्थेचा फटका बसला आहे. लिएंडरला रिओ मध्ये रहाण्यासाठी खोली मिळालेली नाही. ऑलिम्पिकमध्ये सातवेळा भारताचे प्रतिनिधीत्व करणारा लिएंडर पेस गुरुवारी संध्याकाळी रिओ डी जानेरीयोमध्ये दाखल झाला.
इथे जी वागणूक मिळाली त्यामुळे आपण निराश झालो आहोत असे लिएंडरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. पेसला सध्या राकेश गुप्ता यांची खोली वापरावी लागत आहे. मी सहा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.
मला रहाण्यासाठी खोलीही दिलेली नाही. अशा पद्धतीच्या वागणूकीमुळे मी निराश झालो आहे. मी न्यूयॉर्कमध्ये खेळत होतो. तिथे स्पर्धा संपल्यानंतर पहिले विमान पकडून थेट रिओमध्ये दाखल झालो असे लिएंडरने सांगितले.
लिएंडरला रोहन बोपन्ना बरोबर रुम शेअर करायची नाही त्यासाठी तो तक्रार करत आहे अशी चर्चा सुरु आहे. पण त्यात तथ्य नाही असे झीशानने सांगितले. तो गुरुवारी संध्याकाळी रिओला पोहोचणार याची मला आणि संयोजकांना माहिती होती असे झीशानने सांगितले.