शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

lionel messi Fan: मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 3:02 PM

फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून किताब पटकावला.

नवी दिल्ली : फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून किताब पटकावला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेस मेस्सीचे चाहते जगभर आहेत. मेस्सीचे चाहते भारतातील केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. अशातच मेस्सीच्या संघाच्या विजयानंतर केरळमधील एका हॉटेलचा मालक इतका खूश झाला की त्याने बिर्याणीच्या 1500 प्लेट्स मोफत वाटल्या. खरं तर फिफा विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्यापूर्वी, हॉटेल मालकाने अर्जेंटिना जिंकल्यास 1,500 प्लेट बिर्याणी मोफत वाटण्याचे आश्वासन दिले होते, जे त्याने पूर्ण केले. 

1500 प्लेट मोफत बिर्याणीदरम्यान, केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील पल्लिमुला भागातील रॉकलँड हॉटेलचे मालक शिबू हे अर्जेंटिनाचे कट्टर चाहते आहेत. अर्जेंटिनाच्या विजयानिमित्त बिर्याणीच्या 1000 प्लेट्सचे वाटप करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर फ्रान्सविरूद्ध मिळवलेल्या विजयानंतर स्थानिक लोकांनी हॉटेल बाहेर मोठी गर्दी केली. लोक रांगेत उभे राहून बिर्याणीच्या प्लेट्स घेत होती. हॉटेल मालक शिबू यांनी देखील दिलेला शब्द पाळला. त्यांनी केवळ आपला शब्दच पाळला नाही तर मोफत बिर्याणी प्लेट्सची संख्या 500 ने वाढवली. पत्रकारांशी बोलताना शिबू म्हणाले की, एवढ्या पहाटे एवढा मोठा जनसमुदाय जमेल अशी मला अपेक्षा नव्हती.

"शिबू यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, "मी मोफत बिर्याणी प्लेट्सची संख्या 500 ने वाढवली आहे." तिथे उपस्थित असलेले काँग्रेसचे आमदार शफी पारंबिल यांनी पत्रकारांना सांगितले की, अर्जेंटिनाचे चाहते गेली 36 वर्षे या विजयाची वाट पाहत होते. त्यामुळे 36 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. 

मेस्सीचा भारतातील जबरा फॅन मेस्सीचे जेवढे वय आहे त्याहून अधिक वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत आहोत. अर्जेंटिना हरला तेव्हाही आम्ही त्यांचे समर्थक होतो आणि आता जिंकल्यावरही आम्ही त्यांचे चाहते आहोत. तीन दशकांहून अधिक प्रदीर्घ प्रतीक्षेचा शेवट आपण मोफत बिर्याणी वाटून साजरा करत असल्याचे शिबू यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :KeralaकेरळLionel Messiलिओनेल मेस्सीhotelहॉटेलArgentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉल