पेसमुळे होप्स
By Admin | Updated: September 14, 2014 02:50 IST2014-09-14T02:50:29+5:302014-09-14T02:50:29+5:30
लढवय्या लिएंडर पेस व त्याचा सहकारी रोहन बोपन्ना यांनी आज, शनिवारी इलिजा बोजोलाक व नेनाद जिमोनजिचचा दुहेरीत निर्णायक सेटर्पयत रंगलेल्या लढतीत पराभव केला

पेसमुळे होप्स
डेव्हिस कप : बोपन्नाच्या साथीने दुहेरीत विजय
बंगलोर : लढवय्या लिएंडर पेस व त्याचा सहकारी रोहन बोपन्ना यांनी आज, शनिवारी इलिजा बोजोलाक व नेनाद जिमोनजिचचा दुहेरीत निर्णायक सेटर्पयत रंगलेल्या लढतीत पराभव केला आणि डेव्हिस कप स्पर्धेत सर्बियाविरुद्धच्या विश्व ग्रुप प्ले ऑफ लढतीत भारताच्या आशा कायम राखल्या. 41 वर्षीय पेसने रंगतदार खेळ करीत सर्बियाच्या जोडीची झुंज तीन तासांपेक्षा अधिक वेळ रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत 1-6, 6-7, 6-3, 6-3, 8-6 ने मोडून काढली. या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही सर्बिया संघ या लढतीत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताला विश्व गटामध्ये स्थान मिळविण्यासाठी उद्या, रविवारी खेळल्या जाणा:या परतीच्या एकेरीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळविणो आवश्यक आहे. रविवारी सोमदेवला दुसार लाजोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सोमदेव भारताला बरोबरी साधून देण्यात यशस्वी ठरला; तर पाचव्या सामन्यामध्ये युकी भांबरीला फिलिप क्राजिनोव्हिचविरुद्ध विजय मिळविणो आवश्यक राहील. सर्बियाविरुद्धच्या लढतीत 2-2 अशी बरोबरी झाली, तर कर्णधार आनंद अमृतराज अखेरच्या लढतीत अनुभवी बोपन्नाला खेळविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बोपन्नाला आंतरराष्ट्रीय टेनिसचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याच्यात दडपण झुगारून चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे.
भारताला काल, शुक्रवारी पहिल्या दिवशी खेळल्या गेलेल्या एकेरीच्या दोन्ही लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. युकी भांबरी व सोमदेव देवबर्मन यांना प्रतिस्पध्र्याचे आव्हान मोडून काढण्यात अपयश आले. भारताचे लक्ष अनुभवी पेस व बोपन्ना या जोडीच्या कामगिरीवर केंद्रित झाले होते. ‘केएसएलटीए’च्या टेनिस स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना या जोडीने निराश केले नाही.
दुहेरीच्या लढतीत भारतीय जोडीची सुरुवात निराशाजनक झाली. जागतिक क्रमवारीत दुहेरीत चौथ्या क्रमांकाचा खेळाडू नेनाद जिमोनजिचच्या समावेशामुळे सर्बिया संघ बळकट भासत होता. सर्बियाच्या जोडीने पहिला सेट केवळ 18 मिनिटांमध्ये 6-1 ने जिंकल्यामुळे भारतीय चाहते निराश झाले. टायब्रेकर्पयत लांबलेल्या दुस:या सेटमध्ये सर्बियन जोडीने 7-4 ने सरशी साधत सामन्यात 2-क् अशी आघाडी घेतली. त्यावेळी सर्बिया संघ आजच लढतीचा निकाल निश्चित करणार, असे वाटत होते; पण पेस-बोपन्नाच्या मनात काही वेगळेच होते. भारतीय जोडीने तिस:या व चौथ्या सेटमध्ये प्रत्येकी 6-3 च्या फरकाने बाजी मारत रंगत कायम राखली. पाचव्या व निर्णायक सेटमध्ये पेस व बोपन्ना यांनी संघर्षपूर्ण खेळ केला. 4-4, 5-5 आणि 6-6 अशी बरोबरी होती. भारतीय जोडीने 13 वा गेम जिंकत 7-6 अशी आघाडी घेतली. त्यामुळे सर्बियाची जोडी दडपणाखाली आली. सर्बियन जोडी 15-4क् ने पिछाडीवर होती. त्यावेळी भारतीय जोडीकडे दोन मॅच पॉइंट होते. भारताने विजयी गुण नोंदविताच स्टेडियममध्ये जल्लोष झाला. पेसने उडी मारत बोपन्नाला कवटाळले आणि आनंद साजरा केला. पेस व बोपन्नाने आपली भूमिका चोख बजावली असून, आता भारताची मदार 29 वर्षीय सोमदेव व 22 वर्षीय युकीच्या कामगिरीवर आहे. (वृत्तसंस्था)