पोतरुगालच्या आशा कायम
By Admin | Updated: June 24, 2014 01:30 IST2014-06-24T01:30:42+5:302014-06-24T01:30:42+5:30
सिल्वेस्टर वारेलाने इन्जुरी टाइममध्ये हेडरद्वारे नोंदविलेल्या गोलच्या जोरावर पोतरुगालने अमेरिका संघाला 2-2 ने बरोबरीत रोखले

पोतरुगालच्या आशा कायम
>वारेलाचा इन्जुरी टाइममध्ये गोल : अमेरिकेला 2-2 ने बरोबरीत रोखले
मनाउस : सिल्वेस्टर वारेलाने इन्जुरी टाइममध्ये हेडरद्वारे नोंदविलेल्या गोलच्या जोरावर पोतरुगालने अमेरिका संघाला 2-2 ने बरोबरीत रोखले आणि विश्वकप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या.
मध्यंतरार्पयत क्-1ने पिछाडीवर असलेल्या अमेरिका संघाला दुस:या सत्रत जर्मेन जोन्स व क्लिंट डेम्प्से यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली होती. एक वेळ अमेरिका संघ या लढतीत विजय मिळवत बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करणार, असे वाटत होते; पण वारेलाने पोतरुगाल संघाला बरोबरी साधून दिली. यापूर्वी या लढतीतील पहिला गोल पोतरुगालतर्फे नैनी याने केला होता. सामना संपायला काही सेकंदाचा अवधी शिल्लक असताना वारेलाने गोल नोंदविला. फिफातर्फे वर्षातील सवरेत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरलेला कर्णधार ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या क्रॉसवर वारेलाने अमेरिकन गोलकिपर चीम हॉवर्डला गुंगारा देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. जर्मनीविरुद्ध क्-4ने पराभव स्वीकारणा:या पोतरुगाल संघाला अद्याप बाद फेरी गाठण्याची संधी आहे. या संघांदरम्यानअखेरची साखळी लढत गुरुवारीच होणार आहे. पोतरुगाल संघाने या लढतीत चांगली
सुरुवात केली. नैनीने मिळालेल्या संधीवर गोल नोंदवत पोतरुगाल संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. रोनाल्डोने अमेरिकेच्या तीन बचावपटूंना गुंगारा देत चढाई केली; पण अखेर त्याला गोलजाळ्याचा वेध घेता
आला नाही.
मध्यंतरानंतर अमेरिका संघाने आक्रमक खेळ केला. जोन्सने 64व्या मिनिटाला अमेरिका संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर डेम्प्सेने विश्वकप स्पर्धेतील वैयक्तिक चौथा गोल नोंदविताना अमेरिकेला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अमेरिका संघाचा विजय निश्चित वाटत असताना वारेलाने गोल नोंदवित त्यांच्या आशेवर पाणी फेरले. (वृत्तसंस्था)