हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 06:57 IST2018-10-05T06:57:24+5:302018-10-05T06:57:38+5:30

तीन आॅलिम्पिक पदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेले बलबीर यांना २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकदरम्यान निवडण्यात

Hockey player Balbir Singh admitted to Senior Hospital | हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर रुग्णालयात दाखल

हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर रुग्णालयात दाखल

चंदीगड : महान हॉकीपटू बलबीरसिंग सिनियर यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने येथील पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ९४ वर्षांचे बलबीर यांना आयसीयूत ठेवण्यात आले आहे.

तीन आॅलिम्पिक पदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेले बलबीर यांना २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकदरम्यान निवडण्यात आलेल्या १६ महान खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते. आॅलिम्पिक फायनलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा त्यांचा विक्रम अद्याप अबाधित आहे. हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये १९५२ साली त्यांनी नेदरलॅन्डविरुद्ध ६-१ ने मिळविलेल्या विजयात पाच गोल नोंदविले होते. १९५७ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. 
 

Web Title: Hockey player Balbir Singh admitted to Senior Hospital