हॉकी लोकल
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:27+5:302015-02-14T23:50:27+5:30
जेसीपीईचा दमदार विजय

हॉकी लोकल
ज सीपीईचा दमदार विजयआंतर महाविद्यालय हॉकीनागपूर : विदर्भ हॉकी संघटनेच्या यजमानपदाखाली खेळल्या जात असलेल्या आंतर माहविद्यालय हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या लढतीत जेसीपीईने (ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय) एसएफएस महाविद्यालयाचा १२-० ने धुव्वा उडविला. व्हीएचएच्या मैदानावर शनिवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत जेसीपीईतर्फे शाहबाज पठाणने चार गोल नोंदविले. अहफाज पठाणने तीन गोल केले. रविवारी एकही लढत खेळल्या जाणार नाही. सोमवारी या स्पर्धेत जीएस महाविद्यालय विरुद्ध सिंधू महाविद्यालय (सकाळी ९.३० वाजता) आणि दीनानाथ ज्युनिअर कॉलेज विरुद्ध एस.के. पोरवाल महाविद्यालय (सकाळी १०.३० वाजता) संघांदरम्यान लढती होतील. (क्रीडा प्रतिनिधी)