हॉकी - भारताचा चीनवर दणदणीत विजय
By Admin | Updated: October 26, 2016 09:30 IST2016-10-25T20:50:41+5:302016-10-26T09:30:13+5:30
आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेत अव्वल मानांकित भारताने चीनचा 9-0 अशा फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

हॉकी - भारताचा चीनवर दणदणीत विजय
ऑनलाइन लोकमत
मलेशिया, दि. 25 - आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेत अव्वल मानांकित भारताने चीनचा 9-0 अशा फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. भारताच्या खेळाडूंनी आपले धैर्य आणि संयम राखत सामना एकतर्फी जिंकत चीनच्या हॉकीपटूंना जोरदार उत्तर दिले. भारताकडून शानदार खेळी करताना आकाशदीप सिंग, अफ्फान युसूफ आणि जसजित सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
भारताने आपल्या पहिल्या सामन्यात जपान संघाचा १०-२ असा पराभव केला होता. दुस-या सामन्यात भारताला कोरियाविरुद्ध १-१ गोल बरोबरीत समाधान मानावे लागले होते. तर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकचा 3-2 ने धुव्वा उडवला होता.
चार सामन्यातील तिसऱ्या विजयासह भारताच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत. तर ग्रुपमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि मलेशिया 9 गुणासह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.