भारतात हॉकी इंडिया अधिकृत
By Admin | Updated: October 25, 2015 02:30 IST2015-10-25T02:30:57+5:302015-10-25T02:30:57+5:30
भारतात हॉकीचे संचालन करण्यासाठी हॉकी इंडिया ही एकमेव अधिकृत राष्ट्रीय संस्था असल्याचे सांगून भारतीय हॉकी महासंघासंदर्भातील सर्व रेकॉर्ड पुसून टाकावेत

भारतात हॉकी इंडिया अधिकृत
नवी दिल्ली : भारतात हॉकीचे संचालन करण्यासाठी हॉकी इंडिया ही एकमेव अधिकृत राष्ट्रीय संस्था असल्याचे सांगून भारतीय हॉकी महासंघासंदर्भातील सर्व रेकॉर्ड पुसून टाकावेत, अशी विनंती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) केली आहे. एफआयएचने नोव्हेंबर २०१४ मध्ये हॉकी इंडियाला अधिकृत मान्यता प्रदान केल्यानंतर भारतीय हॉकी महासंघाने या निर्णयास क्रीडा लवादात आव्हान दिले होते.