हॉकीपटू गुरबाज नऊ महिन्यांच्या बंदीतून मुक्त
By Admin | Updated: October 25, 2015 00:47 IST2015-10-25T00:47:46+5:302015-10-25T00:47:46+5:30
स्टार मिडफिल्डर गुरबाजसिंग याला हॉकी इंडियाने मोठा दिलासा देत शनिवारी नऊ महिन्यांच्या बंदीतून मुक्त केले. खेळाडू वाद आणि तक्रार निवारण समितीच्या बैठकीत हॉकी

हॉकीपटू गुरबाज नऊ महिन्यांच्या बंदीतून मुक्त
नवी दिल्ली : स्टार मिडफिल्डर गुरबाजसिंग याला हॉकी इंडियाने मोठा दिलासा देत शनिवारी नऊ महिन्यांच्या बंदीतून मुक्त केले. खेळाडू वाद आणि तक्रार निवारण समितीच्या बैठकीत हॉकी इंडियाने हा निर्णय घेतला. संघात गटबाजी निर्माण करणे आणि वैमनस्य पसरविण्याच्या आरोपात गुरबाजवर नऊ महिन्यांची बंदी लावण्यात आली होती. दरम्यान, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सोमवारी दिलेल्या निर्णयात गुरबाजवरील बंदी बेकायदेशीर असून ती हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर इभ्रतीसाठी हॉकी इंडियाला पवित्रा घेणे भाग पडले, अशी चर्चा आहे.