सर्वोत्कृष्ट कामगिरीचे श्रेय हिरवानी यांना : राधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 05:47 IST2020-03-01T05:47:03+5:302020-03-01T05:47:07+5:30

करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे श्रेय गोलंदाजी कोच नरेंद्र हिरवानी यांना जात असल्याचे भारतीय महिला संघाची फिरकी गोलंदाज राधा यादव हिने म्हटले आहे.

Hirwani credits best performance: Radha | सर्वोत्कृष्ट कामगिरीचे श्रेय हिरवानी यांना : राधा

सर्वोत्कृष्ट कामगिरीचे श्रेय हिरवानी यांना : राधा

मेलबोर्न : करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे श्रेय गोलंदाजी कोच नरेंद्र हिरवानी यांना जात असल्याचे भारतीय महिला संघाची फिरकी गोलंदाज राधा यादव हिने म्हटले आहे. राधाने टी-२० विश्वचषकात शनिवारी श्रीलंकेविरुद्ध मिळविलेल्या ७ गड्यांच्या विजयात २३ धावा देत ४ गडी बाद केले.
राधा म्हणाली, ‘हिरवानी आमच्या संघासोबत मागच्यावर्षीच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासून आहेत. माझ्या गोलंदाजीवर त्यांनी फार मेहनत घेतली. मी आधी फार विचार करीत असे. मनात अनेक विचार यायचे. हिरवानी सरांनी मला एकाग्रपणे मारा करण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाला. उपांत्य सामन्यात याहून मोठी कामगिरी करण्याचे माझे लक्ष्य असेल.’

Web Title: Hirwani credits best performance: Radha