शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Video: अखेरच्या 10 सेकंदांमध्ये हिमा दासची मुसंडी; थरारक शर्यतीत 'अशी' मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 9:54 AM

निर्णायक क्षणी वेग वाढवत पाचव्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर 

नवी दिल्ली : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील वयोगटातील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत हिमा दासनं इतिहास रचला आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मात्र या सुवर्णपदाकासाठी तिला कठोर संघर्ष करावा लागला. शर्यतीला सुरुवात होताच हिमा मागे पडली होती. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये तिनं निकराची झुंज दिली आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. चौथ्या लेनमधून धावणारी हिमा दास शेवटच्या वळणानंतर रोमानियाच्या आंद्रिया मिकलोसच्या मागे होती. मात्र यानंतरच्या काही क्षणांमध्ये हिमा दासनं वेग वाढवला. अखेरच्या काही क्षणांमध्ये हिमाचा वेग इतका जास्त होता की, तिनं पाचव्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. 18 वर्षांच्या हिमानं 51.46 सेकंदात शर्यत पूर्ण केली. रोमानियाच्या आंद्रिया मिकलोसनं या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. तिनं 52.07 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर अमेरिकेची टेलर मेनसन (52.28 सेकंद) तिसऱ्या क्रमांकावर राहिली. 

हिमा शर्यतीतील निम्म्यापेक्षा अधिक वेळ 4 स्पर्धकांच्या मागे होती. मात्र जसजशी अंतिम रेषा जवळ येऊ लागली, तसातसा हिमानं वेग वाढवत नेला. शर्यतीच्या अंतिम टप्प्यात तिनं सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकलं. हिमानं शेवटच्या 100 मीटरमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. यामुळेच तिला सुवर्ण पदक जिंकण्यात यश आलं. मात्र स्वत:चा 51.13 सेकंदांचा विक्रम मोडण्यात ती अपयशी ठरली. 

टॅग्स :Hima Dasहिमा दासSportsक्रीडा