शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'हारना नहीं है हिमा'... जग जिंकण्यासाठी 'सुवर्णकन्ये'ला वाढवावा लागेल वेग, गाठावी लागेल 'ती' वेळ!

By स्वदेश घाणेकर | Updated: July 23, 2019 16:56 IST

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या दुःखातून भारतीय चाहत्यांना हिमा दासनं बाहेर काढलं. मागील 20 दिवसांत हिमानं तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई करून सुवर्णपंचमी साजरी केली.

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या दुःखातून भारतीय चाहत्यांना हिमा दासनं बाहेर काढलं. मागील 20 दिवसांत हिमानं तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई करून सुवर्णपंचमी साजरी केली. तिच्या या यशानं पुन्हा एकदा मैदानी खेळाकडची ओढ वाढू लागली आहे. भारताला 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमानं मागील दोन वर्षांत फिनिक्स भरारीनं अनेकांना जगण्याचं, लढण्याचं बळ दिलं. युरोपातील विविध स्पर्धांमध्ये तिनं गाजवलेलं वर्चस्व हे प्रेरणादायी आहे. त्यामुळे हिमाकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. आशियाई आणि युरोपातील या स्पर्धांमध्ये सुवर्णभरारी घेतल्यानंतर हिमाकडून आता जागतिक आणि ऑलिम्पिक पदकाचीही अपेक्षा होत आहे. तिची सध्याची कामगिरी आणि जिंकण्याची भूक पाहता, क्रीडाप्रेमींच हेही स्वप्न ती पूर्ण करेल, असा विश्वास आहे. पण, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे किती कठीण आहे, याचे भानही राखायला हवं. 

हिमानं पोजनान अ‍ॅथलेटिक्स ग्रां. प्री. स्पर्धेत ( 2 जुलै ) 23.65  सेकंद, कुटनो अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत ( 7 जुलै) 23.97 सेकंद, झेक प्रजासत्ताक येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स ( 13 जुलै ) स्पर्धेत 23.43 सेकंद आणि झेक प्रजासत्ताक येथीलच टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट ( 18 जुलै) मध्ये 23.25 सेकंदांसह 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. यापैकी एकाही स्पर्धेत हिमाला तिच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या म्हणजेच 23.10 सेकंदाच्या वेळेच्या आसपासही जाता आले नाही. झेक प्रजासत्ताक येथील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री.  (20 जुलै ) येथे 400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले. 400 मीटर शर्यतीतही तिची सर्वोत्तम कामगिरी ही 50.79 सेकंद ( 2018च्या आशियाई स्पर्धेत तिनं ही वेळ नोंदवली होती. तेथे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.) आहे. त्यामुळे झेक प्रजासत्ताक येथील वेळ आणि सर्वोत्तम वेळ यात किती तफावत आहे हे दिसून येईलच.

हिमाचे पुढील लक्ष्य हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. ती म्हणाली,''या पाच सुवर्णपदकांनी ती हुरळून गेलेली नाही. कारण ही पाच सुवर्णपदके म्हणजे सराव होता, आता मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहे.'' जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित करण्यासाठी हिमाला 200 मीटर शर्यतीत 23.02 सेकंद आणि 400 मीटर शर्यतीत 51.80 सेकंदाची पात्रता वेळ नोंदवावी लागणार आहे.  7 सप्टेंबर 2018 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ही वेळ नोंदवून जागतिक स्पर्धेच तिकीट निश्चित करता येणार आहे आणि हिमाकडे आता महिन्याभराचा कालावधी आहे.  

IAAF Releases 2019 World Championships Standards

Athletics at the 2020 Summer Olympics – Qualification

शिवाय ऑलिम्पिकसाठीचीही पात्रता वेळ ही 200 मीटरसाठी 22.80 सेकंद, तर 400 मीटरसाठी 51.35 सेकंद अशी आहे. 26 जून 2020 पर्यंत ऑलिम्पिक पात्रता निश्चित करण्याची अखेरची वेळ आहे. त्यामुळे हिमाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. हिमाची सध्याची कामगिरी ही कौतुकास्पद आहेच, पण ती ऑलिम्पिक आणि जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदक पटकावून देण्यासाठी पुरेशी नाही. तिने सध्याच्या घडीला जिंकलेली सुवर्णपदकाचे महत्त्व कमी करायचे नाही, परंतु ऑलिम्पिकसाठी तिला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा ठेवा, पण त्याचे दडपण तिच्यावर लादू नका. 

टॅग्स :Hima Dasहिमा दास