चालण्याच्या व्यायामाला राज्यात सर्वाधिक प्रतिसाद; आरोग्य व वेदनांपासून आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:54 AM2019-09-09T02:54:13+5:302019-09-09T02:54:22+5:30

योग आणि धावण्याला दुसरी व तिसरी पसंती, वेदनांसाठी वापरली जातात शामके

The highest response in the state to walking exercise | चालण्याच्या व्यायामाला राज्यात सर्वाधिक प्रतिसाद; आरोग्य व वेदनांपासून आराम

चालण्याच्या व्यायामाला राज्यात सर्वाधिक प्रतिसाद; आरोग्य व वेदनांपासून आराम

Next

मुंबई : व्यायामात लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम् आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सवार्थसाधनम् या संस्कृत वचनामधून आपणाला व्यायाम आणि निरोगी जीवनाची महती कळते. या वचनाचा अर्थ आहे, नियमित व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, आयुर्मान वाढते, ताकद मिळते आणि सुखाची प्राप्ती होते. थोडक्यात निरोगी असणे ही भाग्याची गोष्ट असून निरोगी जीवनामुळे सर्व कार्ये सिद्ध होतात.
‘लोकमत’च्या इनसाईट टीमने राज्याच्या विविध भागातील लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या व्यायामाच्या सवयी आणि वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी केले जाणारे उपाय याबाबतची माहिती संकलित केली. त्यामधून चालण्याचा व्यायाम हा सर्वात लोकप्रिय असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय योग आणि पळणे या व्यायाम प्रकारांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसºया क्रमांकाची पसंती आहे. महिलांची तिसºया क्रमांकाची पसंती नृत्याला मिळाली आहे. १७ टक्के व्यक्ती या कोणताही व्यायाम प्रकार करीत नाहीत. यामध्ये मात्र स्त्री-पुरूष यांच्यामध्ये समानता दिसून येते.

शारीरिक वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी केल्या जात असलेल्या विविध उपायांमध्ये वेदनाशामक औषधे, बाम किंवा द्रावणे यांचा वापर सर्वाधिक २६ टक्के व्यक्ती करीत असतात. त्यापाठोपाठ झोप किंवा विश्रांती घेण्याला (२४ टक्के) पसंती आहे. १७ टक्के य्यक्ती शारीरिक वेदनांसाठी डॉक्टरकडे जात असतात, असेही या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. शारीरिक वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी वापरल्या जाणाºया विविध औषधांमध्ये झंडूची उत्पादने ही सर्वाधिक (१८ टक्के) वापरली जात असल्याचे या सर्वेक्षणामध्ये दिसून आले. यापाठोपाठ मूव्ह (१५ टक्के), वोलिनी,आयोडेक्स ( प्रत्येकी १० टक्के), व्हिक्स (७ टक्के) यांचा क्रमांक लागतो. उर्वरित ४० टक्के ग्राहक हे विविध १९ ब्रॅण्डची उत्पादने वापरीत असल्याचेही दिसून आले आहे.
 

Web Title: The highest response in the state to walking exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.