शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल ८ द्वारे शानदार पुनरागमन करायचे

By admin | Updated: April 4, 2015 04:09 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबशी करार झाल्यानंतर इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये पहिले पाऊल ठेवण्यास आतुर असलेला लेगस्पिनर योगेश

इंदौर : किंग्ज इलेव्हन पंजाबशी करार झाल्यानंतर इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये पहिले पाऊल ठेवण्यास आतुर असलेला लेगस्पिनर योगेश गोलवलकरने आज या प्रसिद्ध टी २0 स्पर्धेच्या आठव्या पर्वाद्वारे भारतीय भूमीवरील स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे असल्याचे म्हटले आहे.३५ वर्षीय गोळवलकर म्हणाला, ‘‘मी आयपीएलशी प्रथमच जुळलो गेल्यामुळे खूप उत्साहित आहे. किंग्ज इलेव्हनने माझ्याशी करार करून महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आयपीएल ८ माझ्यासाठी मोठ्या संधीप्रमाणे आहे. मी याद्वारे भारतीय भूमीवर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू इच्छितो.’’या लेगस्पिनरने सांगितले की, त्याने २00८-0९ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान मध्यप्रदेशकडून अखेरचा प्रथमश्रेणी सामना खेळला होता. त्यानंतर तो एमबीएच्या अभ्यासासाठी ब्रिटनला गेला होता. तो २0१४ मध्ये मायदेशात परतला आणि एका आयटी फर्ममध्ये तो काम करू लागला.तो म्हणाला, मी प्रथमश्रेणी क्रिकेटचा जास्त आनंद घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी माझ्या मनाचा आवाज ऐकून अभ्यासासाठी ब्रिटनला जाण्याचा निर्णय घेतला; परंतु क्रिकेट माझ्या जीवनातून कधीच गायब झाले नाही. मी इंग्लंडमध्ये अभ्यासादरम्यान व्यावसायिक क्रिकेट खेळत राहिलो.’’ या ३५ वर्षीय गोलंदाजाने म्हटले, ‘‘शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांच्यासारख्या गोलंदाजांनी त्यांच्या कारकीर्दीत उत्कृष्ट गोलंदाजी केली तेव्हा तो वयाच्या तिशीत होता. तथापि, अनुभवाच्या बळावर मी अजूनही चांगली कामगिरी करू शकतो.’’गोळवलकरने २0 वर्षांच्या वयात मध्यप्रदेशकडून खेळताना स्पर्धात्मक क्रिकेट जगतात पहिले पाऊल ठेवले होते; केनिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय अ संघात निवड झाली तेव्हा त्याची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली.