हार्दिकने ठोकल्या षटकांत ३४ धावा
By Admin | Updated: January 12, 2016 04:19 IST2016-01-12T04:19:12+5:302016-01-12T04:19:12+5:30
बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सी ग्रुपमध्ये धुवाधार बॅटिंग करताना षटकात ३४ धावा कुटल्या. दिल्लीचा मध्यमगती गोलंदाज आकाश

हार्दिकने ठोकल्या षटकांत ३४ धावा
नवी दिल्ली : बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सी ग्रुपमध्ये धुवाधार बॅटिंग करताना षटकात ३४ धावा कुटल्या. दिल्लीचा मध्यमगती गोलंदाज आकाश सुदनने या षटकांत एकूण ३९ धावा दिल्याने न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिशने जुलै २०१२मध्ये एका षटकांत ३८ धावा काढल्याचा विक्रम आज मोडला गेला.
पंड्याच्या या तुफानी खेळीनंतरही बडोदा संघ या सामन्यात ५ विकेटनी पराभूत झाला. या सामन्यात १९व्या षटकांत पंड्याने सुदनला ५ षटकार आणि एक चौकार ठोकला, तर एक धाव नोबॉलची व एका चेंडूवर बाईजच्या चार धावा निघाल्या. या षटकात ३९ धावा देणाऱ्या सुदनने यापूर्वीच्या ३ षटकांत ८ धावा देऊन २ बळी घेतले होते. पण, शेवटच्या षटकाने त्याचे सर्व पृथक्करणच बदलून टाकले.
आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघात समावेश झालेल्या हार्दिकला या खेळीमुळे अंतिम ११ जणांमध्ये जागा मिळण्यास सोपे जाईल.
टी-२० क्रिकेटमध्ये षटकांत सर्वाधिक ३८ धावा काढण्याचा स्कॉट स्टायरिशचा विक्रम मोडण्यात हार्दिकला यश मिळाले. स्टायरिशने २०१२मध्ये एका कौंटी सामन्यात हा विक्रम केला होता.
पंड्याची जोरदार फलंदाजी आयपीएल २०१५च्या सत्रापासून चर्चेत आली होती. मुंबई
इंडियन्सने त्याला फिनिशर म्हणून वापरले होते. (वृत्तसंस्था)