Hana Kimura, Terrace House star and pro wrestler, dies aged 22 svg  | धक्कादायक : जपानच्या 22 वर्षीय स्टार कुस्तीपटू हॅना किमुराचे निधन

धक्कादायक : जपानच्या 22 वर्षीय स्टार कुस्तीपटू हॅना किमुराचे निधन

जपानची व्यावसायिक कुस्तीपटू हॅना किमुरा हिचे वयाच्या 22 व्या वर्षी निधन झाले. तिनं सोशल मीडियावर एक सुसाईड नोट लिहिल्याची चर्चा आहे. पण, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Terrace House या रिअॅलिटी शोमधील प्रमुख भूमिका ती करत होती. सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.  

जपानची कंपनी वर्ल्ड वंडर रिंग स्टारडम यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की,''हॅना किमुरा जग सोडून गेली, हे सांगताना आम्हाला दुःख होत आहे. तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि तुम्हीही त्यांना पाठिंबा द्या.''  कुस्तीपटूच्या घरी किमुराचा जन्म झाला आणि 2016पासून ती व्यावसायिक कुस्तीत सहभाग घेत आहे.   

English summary :
Tired of Cyber Bullying, Hana Kimura Dies Aged 22 after Posting Photos of Self Harm and Suicide Note

Web Title: Hana Kimura, Terrace House star and pro wrestler, dies aged 22 svg 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.