विंडीजचा निम्मा संघ तंबूत.

By Admin | Updated: March 6, 2015 13:41 IST2015-03-05T23:31:25+5:302015-03-06T13:41:49+5:30

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलसह अन्य फलंदाजही स्वस्तात तंबूत परतल्याने विंडीजचा अवस्था बिकट झाली आहे.

Half of the West Indies team tent | विंडीजचा निम्मा संघ तंबूत.

विंडीजचा निम्मा संघ तंबूत.

ऑनलाइन लोकमत 

पर्थ, दि. ६ -  भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-याने वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलला रोखण्यात यश आले असून दोनदा जीवदान मिळूनही गेल २१ धावांवर बाद झाला आहे. विंडीजचे अन्य फलंदाजही अपयशी ठरत असून विंडीजची अवस्था २२ षटकांत ६ बाद ७५ अशी झाली आहे.  

वर्ल्डकपमध्ये सलग तीन विजय नोंदविणा-या टीम इंडियापुढे आज वेस्ट इंडिजला पराभूत करीत विजयी घोडदौड कायम राखण्याचे आव्हान आहे.  विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मोहम्मद शमी, उमेश यादव या दुकलीने भेदक मारा करत गेलला फटकेबाजी करण्यास वाव दिला नाही. मोहम्मद शमीने ड्वॅन स्मिथला ६ धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर मार्लोन सॅम्यूअल्सही धावबाद झाला. मोहम्मद शमीनेच ख्रिस गेललाही बाद केले. यानंतर उमेश यादव दीनेश रामदीनला त्रिफळाचीत करत विंडीजला चौथा धक्का दिला. 

 

Web Title: Half of the West Indies team tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.