हाफीझ, असलम यांचे शानदार अर्धशतक

By Admin | Updated: August 4, 2016 20:29 IST2016-08-04T20:29:45+5:302016-08-04T20:29:45+5:30

पहिल्याच षटकात मोहम्मद हाफीझच्या रुपाने झटका बसल्यानंतर सामी असलम (६४*) आणि अझहर अली (६९*) यांनी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सावरले.

Hafiz, Aslam, Superb half-century | हाफीझ, असलम यांचे शानदार अर्धशतक

हाफीझ, असलम यांचे शानदार अर्धशतक

इंग्लंड वि. पाकिस्तान : अडखळत्या सुरुवातीनंतर संघाला सावरले
बर्मिंघम : पहिल्याच षटकात मोहम्मद हाफीझच्या रुपाने झटका बसल्यानंतर सामी असलम (६४*) आणि अझहर अली (६९*) यांनी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सावरले. इग्लंडला पहिल्या डावात २९७ धावांत गुंडाळल्यानंतर असलम - अझहर यांनी केलेल्या नाबाद १४४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत १ बाद १४४ अशी भक्कम सुरुवात केली आहे.
पहिल्याच दिवशी सोहेल खानच्या भेदक माऱ्यापुढे यजमान इंग्लंडचा डाव तीनशेच्या आत गुंडाळल्यानंतर पाकिस्तानने अडखळत्या सुरुवातीनंतर मजबूत मजल मारली. डावाला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानला हाफिझच्या रुपाने पहिला धक्का बसला. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर तो बॅलन्सकडे झेल देऊन शुन्यावर परतला. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या धावफलकावर एकही धाव नोंदली गेली नव्हती. मात्र यानंतर असलम व अझहर यांनी संघाला सावरले. सामीने १४५ चेंडूत ७ चौकारांसह ६४ धावा काढल्या आहेत. तर त्याला उत्तम साथ देताना अझहर १६६ चेंडूत ६ चौकारांसह ६९ धावांवर खेळत आहे. (वृत्तसंस्था)
.....................................
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद २९७ धावा
पाकिस्तान (पहिला डाव) : मोहम्मद हाफीझ झे. बॅलन्स गो. अँडरसन ०, सामी असलम खेळत आहे ६४, अझहर अली खेळत आहे ६९. अवांतर - ११. एकूण : ५२ षटकात १ बाद १४४ धावा
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १३-४-२२-१; स्टुअर्ट ब्रॉड १२-३-२४-०; स्टिव्हन फिन १२-३-३३-०; ख्रिस वोक्स १०-०-२८-०; मोईन अली ५-०-२७-०.

Web Title: Hafiz, Aslam, Superb half-century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.