जिम्नॅस्टिक स्मिथ हेअर स्टाईलमुळे आला चर्चेत
By Admin | Updated: August 7, 2016 21:24 IST2016-08-07T21:23:31+5:302016-08-07T21:24:26+5:30
ब्रिटनचा जिम्नॅस्टिक लुईस स्मिथ़ स्मिथ आपल्या अनोख्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे़

जिम्नॅस्टिक स्मिथ हेअर स्टाईलमुळे आला चर्चेत
रियो डि जेनेरिओ: ब्राझीलच्या रियोमध्ये खेळाव्यतिरिक्तदेखील काही खेळाडू चर्चेत आले आहेत ते आपल्या एका विशेष बाबीमुळे़ त्यापैकी एक म्हणजे ब्रिटनचा जिम्नॅस्टिक लुईस स्मिथ़ स्मिथ आपल्या अनोख्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे़ लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा लुईसच्या पॉमेल हॉर्सवरील शारीरिक कसरतीपेक्षा अधिक त्याचे केस आकर्षिक करीत आहेत़ त्याने वरच्या दिशेने एक शेंडीदेखील राखली आहे़ जे सर्वांचे ध्यान केंद्रित करीत आहे़ २७ वर्षीय लुईस म्हणाला, येथे लोक माझ्या हेअरस्टाईलला ह्यमॅन बनह्ण म्हणत आहेत; मात्र मी याला कोणतेही नाव दिले नाही़ मी माझे केस थोडेसे वाढविले आहे़ जे इकडे तिकडे विखुरलेले होते़ ही एक वेगळीच स्टाईल आहे़ म्हणून लोकांना आवडत आहे़ फॅशनची आवड असलेल्या लुईसने आपल्या पाठीवरदेखील अँजेल्सचे टॅटू कोरून घेतले आहे.