शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

गुरुसाईदत्त, साईप्रणीत मुख्य स्पर्धेत

By admin | Updated: April 7, 2015 23:26 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक विजेता आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि युवा खेळाडू बी. साई प्रणीत हे सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचले आहेत.

सिंगापूर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक विजेता आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि युवा खेळाडू बी. साई प्रणीत हे सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचले आहेत.गुरुसाईदत्तने पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुनसाक पोनसाना याचा १८-२१, २१-१८, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर त्याने चीन तैपईच्या जू वेई वाँग याच्यावर २१-९, २१-१३ असा विजय मिळवला.प्रणीतने डेन्मार्कच्या रास्मस फ्लाडबर्ग याचा १८-२१, २१-१८, २१-१२ असा पराभव केला. त्यानंतर मलेशियाच्या जुल्फादली जुल्किफ्लीने माघार घेतल्याने प्रणीतचा मुख्य फेरीतील प्रवेश सुकर झाला. गेल्या महिन्यात युगांडा आणि रोमानिया येथे विजेतेपद पटकावणारे कोना तरुण आणि एन. सिक्की रेड्डी यांनीही मुख्य ड्रॉमधील आपला प्रवेश निश्चित केला. त्यांनी सिंगापूरच्या जियान लियांग ली आणि जिया यिंग क्रिस्टल वोंग यांचा २१-११, २१-१२ असा पराभव केला आणि त्यानंतर मलेशियाच्या रजीफ अब्दुल लतीफ व एस. सानिरू यांना २१-११, २१-१७ असे नमवले.तथापि, अजय जयराम मुख्य फेरीत पोहोचू शकला नाही. त्याने पहिल्या फेरीत मलेशियाच्या डारेन लिये याचा २१-३, १४-२१, २१-१७ असा पराभव केला; परंतु दुसऱ्या फेरीत त्याला सायमन सेंतोसो याच्याकडून १६-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील खेळाडू किदाम्बी श्रीकांत, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप आणि इंडोनेशिया मास्टर्सचा विजेता एच.एस. प्रणय हे उद्यापासून आपल्या अभियानास सुरुवात करतील. (वृत्तसंस्था)