शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा मुंबईवर ६ गडी राखून विजय

By admin | Updated: May 21, 2016 23:30 IST

कर्णधार सुरेश रैना आणि मॅक्युलमच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर गुजरातने मुंबईवर ६ गडी राखून विजय मिळवला. रैनाने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ३६ चेंडूत ५८ धावांची खेळी केली

ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २१ : कर्णधार सुरेश रैना आणि मॅक्युलमच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर गुजरातने मुंबईवर ६ गडी राखून विजय मिळवला. सलामीविर फिंच झटपट बाद झाल्यानंतर रैना-मॅक्युलम या जोडीने आक्रमक फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. रैना-मॅक्युलम ने दुसऱ्या गड्यासाठी  ९ षटकात ९६ धावांची भागीदारी केली. रैनाने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ३६ चेंडूत ५८ धावांची खेळी केली तर मॅक्युलमने २७ चेंडूत आक्रमक ४८ धावा केल्या. डेवेन स्मिथने ताबोडतोप फलंदाजी करताना २७ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली.
 
त्यापुर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार रोहित शर्माने करून दिलेल्या आक्रमक सुरुवातीनंतर ड्वेन स्मिथ व धवल कुलकर्णीच्या अचूक गोलंदाजीपुढे धावसंख्येला खीळ बसल्याने गतविजेत्या मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सविरुद्ध २० षटकांत ८ बाद १७२ धावांची मजल मारली. सलग दोन षटकांत ३ प्रमुख फलंदाज बाद झाल्याने मुंबईकर दडपणाखाली आले. स्मिथने भेदक मारा करताना मार्टिन गुप्टिल व कृणाल पंड्या यांना एकाच षटकात बाद करून मुंबईला बॅकफूटवर आणले.
 
मात्र, युवा फलंदाज नितीश राणाने या दडपणाचा आपल्या फलंदाजीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ न देता ३६ चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करताना ७० धावांचा तडाखा दिला. त्याने अनुभवी जोस बटलरसह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची निर्णायक भागीदारी करून मुंबईला सावरले. बटलर ३१ चेंडूत ३३ धावा काढून परतला. यानंतर राणाही लगेच बाद झाल्याने पुन्हा मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक लागला. यानंतर केरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या व हरभजनसिंग यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना फारसे यश आले नाही.