शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:53 AM

केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

- सचिन भोसलेकोल्हापूर : केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.दरवर्षी देशातील अनुदानित शाळांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. परंतु या जीएसटीचा बोजा शाळा व विद्यार्थ्यांवर पडत आहे. विशेष म्हणजे, क्रीडा साहित्यावर ५, १२, १८ व २८% अशा चार टप्प्यांत कराची आकारणी केली आहे.दर्जानुसार परदेशी व भारतीय बनावटीचे क्रीडा साहित्य आधीच महाग आहे. त्यात जीएसटीच्या फोडणीने चांगलाच ठसका लागत आहे.परदेशी बनावटीच्या क्रिकेट बॅटची किंमत ५ ते ३० हजारांदरम्यान आहे. ५ हजारांच्या बॅटवर १२ टक्के जीएसटी म्हटला तर ५६०० रुपये इतकी किंमत होते. यामध्ये केंद्राचाही जीएसटी धरला तर हीच बॅट ६२०० रुपयांवर जाते. अशीच कमी-जास्त प्रमाणात परिस्थिती इतर खेळांच्या साहित्याची आहे.क्रीडा साहित्याच्या किमती आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्यात जीएसटीच्या रूपाने कर आकारणी झाल्याने या वस्तू कोणी खरेदीसाठी येईनासे झाले आहे. त्यामुळे खेळ साहित्यावरील जीएसटी सरकारने रद्द करावा.- सदा पाटील, क्रीडा साहित्य विक्रेते व ज्येष्ठ क्रिकेटपटूसाहित्य जीएसटीपूर्वीचे जीएसटीनंतरचेदर दर(२८%)थाळीफेक थाळी (१ किलो) ५८० रु. ६८० रु.गोळाफेकचा गोळा (१ किलो) ८५० रु. १०५० रु.कॅरम बोर्ड ९५० रु. ११५० रु.उड्या मारण्याची दोरी ५० रु. ८५ रु.(१२%)लेझीम ७० रु. ९० रु.फुटबॉल ५५० रु. ६८० रु.बॅट (भारतीय बनावट) ६०० रु. ७५० रु.हँडग्लोज २५० रु. ३२० रु.टेनिस रॅकेट २५० रु. जोडी ३०० रु.टेनिस बॉल ६० रु. ७५ रु.लेदर बॉल १८० रु. २२० रु.सायकलिंग हेल्मेट ३८० रु. ५८० रु.

टॅग्स :Sportsक्रीडाGSTजीएसटी