ग्रीसने जपानला बरोबरीत रोखले

By Admin | Updated: June 21, 2014 00:34 IST2014-06-21T00:34:36+5:302014-06-21T00:34:36+5:30

ग्रीस संघाने 1क् खेळाडूंसह खेळताना विश्वकप फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी ‘क’ गटाच्या सामन्यात जपानला गोलशून्यने बरोबरीत रोखले.

Greece stuck to Japan | ग्रीसने जपानला बरोबरीत रोखले

ग्रीसने जपानला बरोबरीत रोखले

>नटाल : ग्रीस संघाने 1क् खेळाडूंसह खेळताना विश्वकप फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी ‘क’ गटाच्या सामन्यात जपानला गोलशून्यने बरोबरीत रोखले. ग्रीस व जपान संघांना यापूर्वी पहिल्या सामन्यात आपापल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 
बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी उभय संघ या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक होते. कर्णधार कोस्तास कात्सोरेनिसविना 52 मिनिटे खेळणा:या ग्रीस संघाने सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला.  या लढतीत जपान संघाने वर्चस्व गाजविले खरे, पण मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात त्यांना अपयश आले. ग्रीसच्या बचावपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली.   
जपान-ग्रीस संघांदरम्यानची लढत अनिर्णित संपल्यामुळे कोलंबियाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला. कोलंबियाने दोन विजय मिळवित 6 गुणांची कमाई केली आहे. आशियाई चॅम्पियन जपान संघाला तिस:यांदा बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात कोलंबियाचा पराभव करणो आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)
 
कोलंबियाला फायदा !
जपान-ग्रीस संघांदरम्यानची लढत अनिर्णित संपल्यामुळे कोलंबियाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला. कोलंबियाने 2 विजय मिळवित 6 गुणांची कमाई केली आहे. 

Web Title: Greece stuck to Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.