ग्रीस शूट 'आऊट'!

By Admin | Updated: June 30, 2014 08:35 IST2014-06-30T05:02:58+5:302014-06-30T08:35:13+5:30

फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी झालेल्या सामन्यात कोस्टारिका संघाने ग्रीस संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव केला

Greece shoot 'out'! | ग्रीस शूट 'आऊट'!

ग्रीस शूट 'आऊट'!

कोस्टारिका संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
ऑनलाइन टीम 
रेसिफे, दि. ३० - फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी झालेल्या सामन्यात कोस्टारिका संघाने ग्रीस संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव केला व सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. 
भारतीय वेळेनूसार सकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू राहिलेला हा सामना अत्यंत अटीतटीचा राहिला. कोस्टारिकाच्या रुईझने ५२ व्या मिनिटाला पहिला गोल करीत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना गोल करणे शक्य झाले नाही. कोस्टारिकाचा संघ विजयी होतोय की काय असे वाटत असतानाच ९० व्या मिनिटाला ग्रीसच्या सॉक्रीटसने गोल केला व कोस्टारिकाविरूध्द संघाला बरोबरी साधून दिली. दोन्ही संघाची बरोबरी असल्याने या सामन्यात वेळ वाढवून देण्यात आला. परंतू वाढवून देण्यात आलेल्या वेळेतही कोणत्याही संघाला गोल करता न आल्याने अखेर पेनल्टी शूटआऊट देण्यात आली. दोन्ही संघात प्रारंभीपासून अटीतटीचा असलेला खेळ पेनल्टी शूटआऊटमध्येही तसाच पाहायला मिळाला. दोन्ही संघाने एकापाठोपाठ एक असे ३-३ पेनल्टी गोल केले. दोन्ही संघाच्या या बरोबरीमुळे उपस्थित फुटबॉलप्रेमींना श्वास रोखून धरायला लावला होता. परंतू ग्रीसच्या चौथ्या खेळाडूला गोल नोंदवता न आल्याने  ग्रीसच्या पराभवाला हा टर्निंग पॉईंट ठरला. व अखेर कोस्टारिका संघाने ग्रीसचा ५-३ असा पराभव केला. 'ड' गटात उरूग्वेला मागे सारून ७ गुणांसह कोस्टारिका संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती कोस्टारिका संघाने ग्रीस विरूध्द केली.  कोस्टारिका संघ १९९० नंतर पहिल्यांदाच  उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. 

 

Web Title: Greece shoot 'out'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.