ग्रीस इतिहास रचणार?
By Admin | Updated: June 29, 2014 01:44 IST2014-06-29T01:44:20+5:302014-06-29T01:44:20+5:30
पहिल्यांदाच बाद फेरीत पोहोचणारा ग्रीस संघ फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रविवारी कोस्टारिकाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून नवा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल़

ग्रीस इतिहास रचणार?
>रेसिफे : पहिल्यांदाच बाद फेरीत पोहोचणारा ग्रीस संघ फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रविवारी कोस्टारिकाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून नवा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल़ दुसरीकडे, कोस्टारिकासुद्धा 199क्नंतर पहिल्यांदाच बाद फेरीत पोहोचला आह़े हा संघ सामन्यांत ग्रीसचे आव्हान पेलण्यास सज्ज आह़े
‘ड’ गटात उरुग्वेला मागे सारून 7 गुणांसह कोस्टारिकाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता़ कोस्टारिका संघातील खेळाडूंची मैदानावर खेळण्याची एक विशेषता आह़े त्यांचे खेळाडू मैदानावर खेळत असताना अत्यंत वेगाने एकमेकांकडे चेंडू पास करतात़ हे बघण्यासारखे आह़े कोस्टारिका संघात अलेक्सांद्रे गुईमारेईससारखा अनुभवी खेळाडू आह़े सेल्सो बोर्गेस याला ग्रीसविरुद्ध संधी मिळू शकत़े ग्रीसने जिओजिओस सामारसच्या पेनल्टीच्या जोरावर आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश केला होता़ ग्रीस आणि कोस्टा रिका या संघांत कोण वरचढ ठरेल, हे आत्ताच सांगणो कठीण आह़े मात्र, गुणतालिकेत 4 गुणांनी ग्रीस कोस्टारिकाच्या मागे आह़े
ग्रीस 2 गोलसह अंतिम 16 संघात पोहोचणारी टीम आह़े अंतिम 16 संघांत स्थान मिळविणा:या संघाचा हा सर्वात कमी स्कोअर आह़े विशेष म्हणजे, ग्रीस असा एकमेव संघ आहे ज्याने नकारात्मक गोल डिफरेंससह बाद फेरीत प्रवेश केला़ कोस्टारिका 4 गोलसह बाद फेरीत पोहोचला आह़े हा ग्रीसनंतर सर्वात कमी स्कोअर आह़े कोस्टारिका आणि ग्रीस या संघांत आतार्पयत एकही सामना झालेला नाही़ त्यामुळे वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीत दोन्ही संघ विजय मिळविण्यासाठी विशेष मेहनत घेतील, अशी आशा आह़े
हेड टू हेड..
कोस्टारिका आणि ग्रीस या दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध खेळण्याचा योग आतार्पयत तरी आलेला नाही. त्यामुळे विश्वचषकात प्रथमच उभय संघ एकमेकांसमोर उभे राहतील. ग्रीसने आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषकातील दुसरा विजय नोंदविला आहे. तसेच त्यांचा अॅड्रिएस समारिस हा विश्वचषकात गोल नोंदवणारा पहिला मिडफिल्डर ठरला.