महान धावपटू उसेन बोल्ट बनला पिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:49 IST2020-05-20T01:48:15+5:302020-05-20T01:49:09+5:30

किंग्स्टन : जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट पहिल्यांदा पिता बनला. त्याची पार्टनर केसी बेनेट हिने मुलीला जन्म दिला. जमैकाचे ...

The great runner Usain Bolt became the father | महान धावपटू उसेन बोल्ट बनला पिता

महान धावपटू उसेन बोल्ट बनला पिता

किंग्स्टन : जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट पहिल्यांदा पिता बनला. त्याची पार्टनर केसी बेनेट हिने मुलीला जन्म दिला. जमैकाचे पंतप्रधान अ‍ॅन्ड्रयू होलनेस यांनी सोशल मीडियावर कन्यारत्नप्राप्तीसाठी बोल्टचे अभिनंदन केले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमानुसार मुलीचा जन्म रविवारी झाला. त्याआधी ३३ वर्षांच्या बोल्टने मार्च महिन्यात बेनेट लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचा खुलासा केला होता. ८ आॅलिम्पिक सुवर्णपदकांचा मानकरी असलेल्या बोल्टने १०० आणि २०० मीटर शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला आहे. वायुवेगाने धावणारा खेळाडू अशी ख्याती असलेल्या बोल्टने २०१७ ला निवृत्ती घेतली. (वृत्तसंस्था)

Web Title: The great runner Usain Bolt became the father