शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महीला क्रिकेट टीमची विश्वविक्रमाला गवसणी, 320 धावांची भागीदारी

By admin | Updated: May 15, 2017 22:51 IST

भारतीय महीला क्रिकेट टीमने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ति शर्मा आणि पूनम राउत या दोघींनी इतिहास रचला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पोचेफ्स्ट्रूम, दि. 15 - भारतीय महीला क्रिकेट टीमने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ती शर्मा आणि पूनम राउत या दोघींनी इतिहास रचला आहे. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 320 धावांची भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय महीला एकदिवसीय क्रिकेटमधील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.  दीप्ती शर्माने 188 धावांची खेळी केली मात्र, महीला क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणारी दुसरी महिला खेळाडू होण्याची तिची संधी हुकली .
 
दीप्तीने केलेल्या 188 धावा हा भारतीय महीला क्रिकेटमधला नवा विक्रम ठरला. शिवाय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या ठरली आहे. या विश्वविक्रमी खेळीदरम्यान दीप्तीने तब्बल 26 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 188 धावांच्या या खेळीसाठी दीप्तिने केवळ 160 चेंडूंचा सामना केला.  पूनम राउतने 109 धावांची खेळी करून दीप्तीला चांगली साथ दिली. 109 धावांची खेळी करून पूनम रिटायर्ड झाली.भारताच्या दोन महिला फलंदाजांनी एका वन डेत शतके ठोकण्याची ही दुसरी वेळ ठरली.याआधी मिल्टनमध्ये मिताली आणि रेश्मा यांनी शतकांची नोंद केली होती.  भारतीय महिला खेळाडूने 150 च्या वर धावा काढण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 1997 मध्ये आॅस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क हिने डेन्मार्कविरुद्ध मुंबईत नाबाद 229धावांची खेळी केली होती. भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम जया शर्मा हिच्या नावे होता. तिने पाकिस्तानविरुद्ध 2005 मध्ये कराचीत नाबाद 138 धावा ठोकल्या होत्या.  याआधी कुठल्याही गड्यासाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम 268 धावांचा होता. इंग्लंडची सराह टेलर आणि कॅरोलिन अटकिन्सन यांनी द. आफ्रिकेविरुद्ध 2008 मध्ये लॉर्डस्वर सलामीला हा विक्रम केला होता. भारताकडून सर्वाधिक भागीदारीचा विक्रम याआधी रेश्मा गांधी आणि मिताली राज यांच्या नावे आहे. या जोडीने आयर्लंडविरुद्ध 1999 मध्ये मिल्टन येथे 285 धावांची नाबाद भागीदारी केली होती. भारताच्या दोन महिला फलंदाजांनी एका वन डेत शतके ठोकण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी मिल्टनमध्ये मिताली आणि रेश्मा यांनी शतकांची नोंद केली होती. 
 
 
दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफ्स्टूमच्या सेनवेस पार्कमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 300 धावांची भागीदारी करणारी दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघींची ही जगातील पहिलीच सलामीची जोडी ठरली आहे. दोघींच्या या जबरदस्त खेळीच्या बळावर भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 358 धावा केल्या. 359 धावांचा सामना करायला उतरलेल्या आयर्लंडचा अख्खा संघ 40 षटकात केवळ 109 धावांमध्ये गारद झाला. भारतीय महीला संघाने 300 चा आकडा गाठण्याचीदेखील पहिलीच वेळ होती.