औरंगाबादचे गोविंद शर्मा राज्य खो-खो संघटनेवर
By Admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:40+5:302014-08-21T21:45:40+5:30
औरंगाबाद : जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा हे आता राज्य संघटनेवर गेले आहेत. पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या निवडणुकीत औरंगाबादच्या गोविंद शर्मा यांची संयुक्त सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. उस्मानाबादचे चंद्रजित जाधव हे सचिव, लातूरचे विश्वनाथ गायकवाड आणि परभणीचे बाळासाहेब जामकर हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. अध्यक्ष म्हणून अजित पवार आहेत.

औरंगाबादचे गोविंद शर्मा राज्य खो-खो संघटनेवर
औ ंगाबाद : जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा हे आता राज्य संघटनेवर गेले आहेत. पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या निवडणुकीत औरंगाबादच्या गोविंद शर्मा यांची संयुक्त सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. उस्मानाबादचे चंद्रजित जाधव हे सचिव, लातूरचे विश्वनाथ गायकवाड आणि परभणीचे बाळासाहेब जामकर हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. अध्यक्ष म्हणून अजित पवार आहेत.राज्य संघटनेची कार्यकारिणी : अध्यक्ष : अजित पवार (पुणे), उपाध्यक्ष : महेश गादेकर (सोलापूर), बाळासाहेब जामकर (परभणी), पांडुरंग शिंदे (सातारा), विश्वनाथ गायकवाड (लातूर), कार्याध्यक्ष : मंदार देशमुख (नाशिक), सरचिटणीस - चंद्रजित जाधव (उस्मानाबाद), संयुक्त सचिव : गोविंद शर्मा (औरंगाबाद), चित्रा आगळे (बीड), कमलाकर कोळी (ठाणे), गजानन मगदूम (सांगली), सचिन गोडबोले (पुणे), खजीनदार : तुषार सुर्वे. (क्रीडा प्रतिनिधी)