चांगल्या कामगिरीचा संकल्प!
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:46+5:302016-01-02T08:34:46+5:30
‘विक्रमांचा पर्याय’ बनलेला सचिन तेंडुलकर, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांच्यासह देशातील स्टार

चांगल्या कामगिरीचा संकल्प!
नवी दिल्ली : ‘विक्रमांचा पर्याय’ बनलेला सचिन तेंडुलकर, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांच्यासह देशातील स्टार आणि नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा आॅलिम्पिकसह सर्वच स्पर्धांमध्ये अधिक चमकदार कामगिरी करण्याचा विश्वास या खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
आॅलिम्पिक कांस्यविजेती सायना म्हणाली, ‘मी आपल्या मित्रांना आणि चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देते. मागचे वर्ष माझ्यासाठी चांगलेच राहिले; पण नव्या वर्षात नव्या लक्ष्यासह झेप घ्यायची आहे.’
आॅलिम्पिक कांस्यविजेती एमसी मेरिकोम म्हणाली, ‘नववर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. यंदा देशात शांतता, स्थैर्य आणि विकास तसेच सद्भावना वाढीस लागेल अशी मी आशा बाळगते.’ माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद म्हणाला, ‘सर्व क्रिकेटप्रेमींना नववर्षाच्या शुभेच्छा. नव्या वर्षात सर्वांचा आनंद द्विगुणित होवो.’ आशियाड कांस्यविजेता भारतीय हॉकी संघाचा खेळाडू मनप्रितसिंग म्हणाला, ‘विश्वातील सर्व हॉकी चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. मागचे वर्ष हॉकीसाठी व्यस्त होते. यंदा देशासाठी नवी कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक गुरुबक्षसिंग म्हणाले, ‘नववर्षांच्या क्रीडा क्षेत्राला शुभेच्छा. बॉक्सिंगला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. बॉक्सिंगला असेच प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा बाळगतो.’
आॅलिम्पिकला सात महिने आहेत. त्याआधी मला तीन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा खेळाव्या लागतील. कामगिरीत
सातत्य राखण्यावर
माझा भर
असेल.
- सानिया
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा! नव्या वर्षात सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि यश येवो. - सचिन
नव्या वर्षाच्या शुभेच्छा. आपल्या आयुष्यात नव्या वर्षात यश तसेच आनंद येईल, याबद्दल शुभेच्छा!’
- विराट
सर्व मित्र
व चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. चेन्नईतील मृतांसोबत तसेच बेघरांसोबत माझ्या संवेदना आहेत. गतवर्षांतील कामगिरीवर
मी समाधानी आहे.’
- विजेंदर
चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि लक्ष्याचा पाठलाग करीत राहण्याचे आवाहन करतो. माझे लक्ष्य आॅलिम्पिकची पात्रता गाठण्याचे असेल. त्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
- अखिल, चॅम्पियन बॉक्सर, राष्ट्रकुल
रियोेम ३-४ पदके जिंकू!- महाबली सतपाल
रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय मल्ल सुवर्णांसह तीन-चार पदके जिंकतील, असा विश्वास महाबली सतपाल यांंनी व्यक्त केला आहे. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त सतपाल म्हणाले, रियोमध्ये आमचे मल्ल सुवर्णासह तीन-चार पदके जिंकतील असा मला विश्वास आहे. आॅलिम्पिकची तयारी योग्य दिशेने सुरू आहे. सुशीलने २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचे कांस्य आणि २०१२च्या लंडन आॅलिम्पिकचे रौप्य जिंकले होते. आता रियोत सुवर्ण जिंकण्याची वेळ आहे.