Good News: तिरंदाजाला क्रीडा खात्याकडून ५ लाखांची मदत, परिस्थितीमुळे बनला होता कामगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 17:26 IST2018-07-24T17:25:54+5:302018-07-24T17:26:18+5:30
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देऊनही उपजीविकेसाठी रोजंदारीची काम करणा-या तिरंदाजाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अखेर दखल घेण्यात आली.

Good News: तिरंदाजाला क्रीडा खात्याकडून ५ लाखांची मदत, परिस्थितीमुळे बनला होता कामगार
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देऊनही उपजीविकेसाठी रोजंदारीची काम करणा-या तिरंदाजाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अखेर दखल घेण्यात आली. माजी तिरंदाज अशोक सोरेन हा जमशेदपूर येथे रोजंदारीची काम करत आहे आणि त्याला केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
" खेळाडूंसाठी असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीतून ही मदत करण्यात येणार आहे. सोरेन हे जमशेदपूर येथे अत्यंत गरीब परिस्थितीत राहत आहेत," अशी माहिती क्रीडा मंत्रालयाने दिली. सरकारच्या रोजगार हमी योजनेत सोरेन हे काम कर आहे. 28 वर्षीय सोरेनने 2008च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकली होती.
तत्पूर्वी, मंत्रालयाकडून याच योजने अंतर्गत अर्जुन पुरस्कार विजेत्या तिरंदाज लिम्बा राम यांना 5 लाखांची सहकार्य करण्यात आले होते.