खेळाडुंसाठी खुशखबर! 'खेलो इंडिया'तील विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी, सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:52 PM2024-03-06T15:52:00+5:302024-03-06T15:53:38+5:30

देशातील लोकप्रिय 'खेलो इंडिया' खेळातील विजेत्यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Good news for players across inida! winners of 'Khelo India' will get government jobs, announced by the central government | खेळाडुंसाठी खुशखबर! 'खेलो इंडिया'तील विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी, सरकारची घोषणा

खेळाडुंसाठी खुशखबर! 'खेलो इंडिया'तील विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी, सरकारची घोषणा

Khelo India Games: देशभरातील विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी बुधवारी (दि.6) खेलो इंडिया गेम्सच्या (Khelo India Games) खेळाडूंना मोठी भेट दिली. आता खेलो इंडियाचे खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. 

2018 मध्ये पहिल्यांदा खेलो इंडिया गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून या खेळांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या खेळांच्या निकषांमध्ये मोठा बदल केला आहे. खेलो इंडिया गेम्समध्ये पदक जिंकणारे खेळाडू आता सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतील. यापूर्वी खेलो इंडिया गेम्सचे खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र नव्हते, पण सरकारने खेळाडूंना मोठी भेट दिली आहे. 

अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर लिहिले की, मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे निकष बदलण्यात आले आहेत. या पाऊलामुळे आता खेलो इंडियाचे पदक विजेते खेळाडू सरकारी नोकऱ्यासांठी पात्र असतील. या सुधारित नियमांमुळे भारत क्रीडा महासत्ता बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकेल.
 

Web Title: Good news for players across inida! winners of 'Khelo India' will get government jobs, announced by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.