शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुड मॉर्निंग, अंकुर, विजय बजरंग यांची आगेकूच

By admin | Updated: December 26, 2014 01:54 IST

गुड मॉर्निंग, अंकुर आणि विजय बजरंग या संघांनी आपआपल्या सामन्यात विजयी बाजी मारताना यंग भारत सेवा,

मुंबई : गुड मॉर्निंग, अंकुर आणि विजय बजरंग या संघांनी आपआपल्या सामन्यात विजयी बाजी मारताना यंग भारत सेवा, प्रभादेवी यांच्या वतीने आयोजित प्रथम श्रेणी पुरुष कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात गुड मॉर्निंग संघाने अनपेक्षित आगेकूच करताना कसलेल्या गोल्फादेवीचा पिछाडीवरून २६-२१ असा पाडाव केला. सुरुवातीला गोल्फादेवीने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना मध्यांतराला १४-१३ अशी एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली होती. विराज उतेकर, लक्ष्मण दलतोडे यांनी चतुरस्र खेळ करताना गुड मॉर्निंग संघावर लोण चढवताना गोल्फादेवीला आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर सुनील सावंतने चढाई करताना ४ गडी मारत गोल्फादेवीला जबरदस्त झटका दिला. यानंतर झालेल्या आणखी एका चुरशीच्या सामन्यात विजय बजरंगने झुंजार खेळ करताना जय भारतचे आव्हान २३-२० असे परतावून लावले. सुरुवातीपासून पारडे वर-खाली होणाऱ्या या सामन्यात मध्यांतराला विजय संघाने १५-१३ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र त्यांना जय भारतच्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. अजय कुसुमचा अष्टपैलू खेळ व त्याला मिळालेली ओम्कार नेमाणेची उपयुक्त साथ या जोरावर विजय बजरंगने स्पर्धेत विजयी आगेकूच केली. (क्रीडा प्रतिनिधी)