शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : 15 वर्षीय खेळाडूनं विकल्या त्याच्याकडच्या 102 ट्रॉफी; जमा केलेला निधी केला दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 10:47 IST

ज्यांच्याकडे पैसा आहे, ते आर्थिक मदत करून आपले योगदान देत आहेत.

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही हातभार लागत आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली. रोहित शर्मा, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, पी व्ही सिंधू, नीरज चोप्रा, मेरी कोम आणि अनेक क्रीडापटू पुढे येऊन आर्थिक मदत करत आहेत. पण, भारतातील अनेक खेळाडूंकडे दान करण्यासाठी तेवढा पैसा नाही, अशात कारकीर्दित जिंकलेली पदकं आणि चषक हीच त्यांची संपत्ती... भारताचा 15 वर्षीय गोल्फपटू अर्जून भाटी यानं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी त्यानं जिंकलेली 102 चषक विकली आणि उभी राहिलेली रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीत दान केली.

Corona Virus : 'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला मदतीचं आवाहन केलं होतं. कोणतीही मदत ही मोठी किंवा लहान नाही, असंही त्यांनी नमूद केले होते. 15 वर्षीय गोल्फपटूनं त्याची सर्व चषकं विकून 4.30 लाख रुपये जमा केले आणि ती रक्कम त्यानं पंतप्रधान सहाय्यता निधीत जमाही केली.  त्याच्या या चषकांमध्ये तीन वर्ल्ड गोल्फ चॅम्पियन्सशीपची चषकं होती आणि अन्य राष्ट्रीय जेतेपदं होती.''आपला देश सध्या संकटाचा मुकाबला करत आहे. माझ्या देशाच्या मदतीसाठी मी पुढाकार घेतला आहे. माझ्यापरीनं मी मदत करत आहे,'' असे भाटीनं सांगितलं.

तो पुढे म्हणाला,''गेल्या 8 वर्षांत मी 102 चषकं जिकंली आहेत. ही सर्व चषकं विकून मी 4.30 लाखांचा निधी जमा केला आहे आणि तो मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे.'' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या या मदतीचं कौतुक केलं आहे.   

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी