Neeraj Chopra:ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा नव्या अध्यायासाठी सज्ज; दुखापतीनंतर पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 11:06 AM2022-08-24T11:06:03+5:302022-08-24T11:08:14+5:30

भारताचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू नीरज चोप्रा आपल्या नव्या अध्यायासाठी सज्ज झाला आहे.

Golden boy Neeraj Chopra to compete in Lausanne Diamond League from friday  | Neeraj Chopra:ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा नव्या अध्यायासाठी सज्ज; दुखापतीनंतर पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

Neeraj Chopra:ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा नव्या अध्यायासाठी सज्ज; दुखापतीनंतर पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आपल्या नव्या अध्यायासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (CWG 2022) दुखापतीच्या कारणास्तव तो सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र आता 26 ऑगस्टपासून स्वित्झर्लंडमधील लॉसने डायमंड लीग (Lausanne Diamond League) स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी नीरज सज्ज झाला आहे. लॉसनेतील चांगली कामगिरी नीरजचे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी झ्युरिक येथे डायमंड लीगच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित करू शकते, कारण तो सध्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. जे खेळाडू अव्वल सहामध्ये राहतील त्या खेळाडूंना झ्युरिकमध्ये होणाऱ्या फायनलचे तिकिट मिळेल. लॉसनेमधील ही शेवटची स्पर्धा असणार आहे, ज्यामध्ये पुरूषांच्या भालाफेकचा समावेश करण्यात आला आहे. 

पुन्हा एकदा तिरंगा फडकावण्यासाठी सज्ज

अमेरिकेच्या धरतीवर 24 जुलै रोजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती. त्यामुळेच तो बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. चोप्राला वैद्यकीय पथकाने चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. म्हणूनच भारताचा गोल्डन बॉयला बहुचर्चित स्पर्धेला मुकावे लागले. लक्षणीय बाब म्हणजे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला तब्बल 19 वर्षांनी पदक जिंकण्यात यश आले आहे. 

नीरज चोप्राने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "शानदार शुक्रवारसाठी तयारी करत आहे. समर्थनासाठी आपल्या सर्वांचे आभार. लॉसने येथे भेटूया." विशेष म्हणजे आयोजकांनी जेव्हा 17 ऑगस्ट रोजी सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या नावाची जाहीर केली त्यामध्ये नीरज चोप्राच्या नावाचा समावेश नव्हता. कारण दुखापतीमुळे या स्पर्धेत नीरजच्या सहभागाबाबत अटकळ होती. मात्र दिलासादायक बाब म्हणजे नीरज सध्या तंदुरूस्त असून पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर तिरंगा फडकावण्यासाठी सज्ज झाला आहे. 

 

Web Title: Golden boy Neeraj Chopra to compete in Lausanne Diamond League from friday 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.