शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ललिताचा राष्ट्रीय विक्रमासह गोल्डन धमाका

By admin | Updated: April 29, 2016 22:16 IST

लोकमत मिडिया लिमिटेडच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्रीय आॅफ दि इयर यावर्षीच्या पुरस्काराची मानकरी ललिता बाबरने फेडरेशन करंडक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या

फेडरेशन करंडक अ‍ॅथलेटिक्स :सुधा आॅलिम्पिकसाठी पात्र नवी दिल्ली : लोकमत मिडिया लिमिटेडच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्रीय आॅफ दि इयर यावर्षीच्या पुरस्काराची मानकरी ललिता बाबरने फेडरेशन करंडक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्तापित करुन सुवर्णपदक जिंकून आपली मक्तेदारी कायम राखली. पंडित जवाहरलाल स्टेडियमच्या ट्रॅकवर सुरु असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राच्या ललिता बाबरने शर्यतीच्या सुरुवातीपासून निर्विवाद वर्चस्व राखत ९ मिनिट २७.०९ सेकंदात शर्यत पूर्ण करून नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. उत्तर प्रदेशच्या सुधा सिंगने (९मि. ३१.८६से) रौप्य जिंकून रियो आॅलिम्पिकसाठीचे आपले तिकिट निश्चित केले तर पारूल चौधरीने (१०मि. ४७.४९सें.) कास्यपदक जिंकले. महाराष्ट्राच्या शितल भगत व एश्वर्या कल्याणकरला अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत केरळच्या अनिल्दा थॉमसने ५२.४० सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या थाळी फेक प्रकारात कृष्णा पुनियाने ५५.०९ मीटर थाळी भिरकावून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. पुनियाने दुखापतीमुळे खूप दिवस विश्रांती घेतली होती. सुधा सिंगने रियोची पात्रत्रा पूर्ण केल्यानंतर महासंघाचे सचिव सीके वॉलसन यांनी प्रतिष्ठीत शांघाई डायमंड लीगमध्ये सुधा प्रवेश द्यावा अशी विनंती केली आहे. पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात महाराष्ट्राच्या सचिन पाटीलला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. सचिनने ९ मिनिट १२.९९ सेकंदाची वेळ नोंदविली. हरियाणाच्या नवीन कुमारने (८ मि. ५५.०४से.) सुवर्ण तर मणीपूरच्या दुर्गा बुधाने (९ मि.०१.९१ से.) रौप्यपदक जिंकले. (वृत्तसंस्था)