सुवर्ण जिंकणारच : मेरी कोमचा विश्वास
By Admin | Updated: September 14, 2014 02:47 IST2014-09-14T02:47:23+5:302014-09-14T02:47:23+5:30
दक्षिण कोरियातील इंचियोन येथे होणा:या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात कसर सोडणार नाही,

सुवर्ण जिंकणारच : मेरी कोमचा विश्वास
नवी दिल्ली : दक्षिण कोरियातील इंचियोन येथे होणा:या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात कसर सोडणार नाही, असे मत पाचवेळा विश्वचॅम्पियन आणि ऑलिम्पिकपदक विजेती भारताची वरिष्ठ बॉक्सर मेरी कोम हिने व्यक्त केले आह़े
मेरी कोम म्हणाली, आशियाई स्पर्धेसाठी चांगली तयारी सुरू आह़े या स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याचे लक्ष्य आह़े त्यासाठी नियमितपणो कठीण परिश्रम घेत आह़े याच बळावर स्पर्धेत सवरेत्कृष्ट कामगिरी होईल अशी आशा आहे, असेही तिने म्हटले आह़े
मेरी कोम हिने नुकत्याच झालेल्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग नोंदविला नव्हता़ याबद्दल ती म्हणाली, या स्पर्धेसाठी घेण्यात आलेली निवड चाचणी नियमानुसार घेण्यात आली नव्हती़ (वृत्तसंस्था)